मुंबई : गानकोकिळा म्हणून प्रख्यात असलेल्या लता मंगेशकर यांचे गाणे गाऊन रातोरात सुपरडुपर हिट झालेल्या रानू मंडलला चाहत्यांनी प्रचंड प्रेम दिले. यानंतर त्यांच्या काही वागणुकीमुळे पुढे त्यांना काम मिळेनासे झाले होते. अशातच त्यांच्या मदतीला रामायणातील ‘सीता’ अर्थात अभिनेत्री दीपिका चिखलिया धावून आली आहे. लॉकडाऊन काळात हालाखीची परिस्थिती ओढवलेल्या रानू मंडल यांना दीपिकाने त्यांच्या आगामी चित्रपटात गाण्याची संधी दिली आहे.रानू मंडलला मिळाली आणखी एक संधी.
दूरदर्शनवर सर्वात जास्त गाजलेली टीव्ही सीरियल रामायणात यात सीतेची भूमिका साकारून सर्वांची मने जिंकणारी दीपिका चिखलिया बऱ्याच काळानंतर चित्रपटांमध्ये पुनरागमन करणार आहे. सरोजिनी नायडू यांचा बायोपिक ‘सरोजिनी’मध्ये त्या मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. दीपिका चिखलियाच्या या चित्रपटामुळे सोशल मीडिया सेन्सेशन रानू मंडल यांचे नशिब पुन्हा एकदा चमकणार आहे. दीपिकाच्या या चित्रपटात रानू मंडल गाणे गाणार आहे.रानू मंडलला मिळाली आणखी एक संधी.
या संदर्भातली माहिती स्वतः दीपिका चिखलिया यांनी सोशल मीडियावरून दिली आहे. धीरज मिश्रा यांनी लिहिलेले ‘सरोजिनी’ या चित्रपटाचे हे गाणे रानू मंडल यांच्या आवाजात रेकॉर्ड केले जाणार आहे. तसेच, दीपिका यांनी एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांनी रानू मंडल धीरज मिश्रासोबत काम करणार असल्याचे म्हटले आहे. या व्हिडीमध्ये रानू मंडल यांनी गाण्याच्या काही ओळी गात, तुम्ही मला जे प्रेम आणि आदर आधी दिला. तसेच, यावेळीही द्याल, अशी आशा’, असे यात म्हटले आहे.
अजून वाचा
दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी यांना करोनाची लागण