मुंबई- मागील काही दिवसांमध्ये जागतिक घडामोडींचा शेअर मार्केटवर मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडलेला दिसला. याच पाश्र्वभूमीवर बुधवारी सलग आठव्या व्यापार सत्रात शेअर बाजारातील तेजी कायम राहिली.
आज पुन्हा सेन्सेक्स कोविड – १९ लसीच्या विकासामध्ये फायझरच्या यशाच्या बातमीने सेन्सेक्स ३१० अंकांनी वाढून ४३, ५८७ पर्यंत पोहोचला. त्याचबरोबर निफ्टी १०० अंकांच्या वाढीसह १२, ७३१ वर व्यापार करीत आहे. आज पुन्हा सेन्सेक्स आणि निफ्टी सर्वकाळच्या उच्चांकी पातळीवर व्यवहार करत आहेत.
काल बीएसई ३० सेन्सेक्सच्या दिवशी ४३,३१६ अंकांच्या अखेरच्या उच्चांकाला स्पर्श केल्यानंतर अखेर ते ६८०. २२ अंकांनी किंवा १. ६० टक्क्यांनी वाढून,
४३,२७७ अंकांवर बंद झाला. १२, ६४३ च्या सर्वोच्च काळातील उच्चांक गाठल्यानंतर अखेर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी १७०. ०५ अंकांनी वाढून १२,६३६३१. १० वर बंद झाला.