सुपरस्टार चिरंजीवी यांना करोनाची लागण झाली आहे. चिरंजीवी यांनी ट्विटरद्वारे त्यांची करोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याचे सांगितले आहे.
चिरंजीवी यांना करोनाची कोणतीही लक्षणे जाणवत नव्हती. सध्या ते होम क्वारंटाइनमध्ये आहेत. गेल्या पाच दिवसांमध्ये त्यांच्या संपर्कात आलेल्या वक्तींना चिरंजीवी यांनी करोना चाचणी करुन घेण्यास सांगितले आहे. ‘आचार्य चित्रपटाचे चित्रीकरण पुन्हा सुरु करण्यापूर्वी मी माझी करोना चाचणी करुन घेतली आणि ती चाचणी पॉझिटीव्ह आली. मला कोणतीही करोनाची लक्षणे जाणवत नव्हती. मी सध्या होम क्वारंटाइनमध्ये आहे. गेल्या पाच दिवसांमध्ये जे लोकं माझ्या संपर्कात आले कृपया त्यांनी करोना चाचणी करुन घ्या.
मी माझ्या प्रकृतीबाबत माहिती देत राहीन’ असे चिरंजीवी यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. चिरंजीवी हे लवकरच ‘आचार्य’ या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु करणार होते. पण त्यापूर्वी त्यांनी करोना चाचणी करुन घेतली आणि ती पॉझिटीव्ह आली. आता चित्रपटाचे चित्रीकरण पुढे ढकलण्यात आले असल्याचे म्हटले जात आहे. ‘आचार्य’ या चित्रपटात चिरंजीवी हे दोन भूमिका साकारणार आहेत. चाहत्यांमध्ये या चित्रपटाची घोषणा करताच उत्सुकता पाहायला मिळाली होती.


