Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

ओएलएक्सवर सायकल विकणाऱ्या तरुणाची फसवणूक

by Divya Jalgaon Team
November 9, 2020
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
जळगावात पिझ्झ्याबाबत चुकीच्या क्रमांकावर ऑनलाईन तक्रार केल्याची फसवणूक

जऴगाव –  ओएलएक्सच्या माध्यमातुन साय़कल विक्री करण्याच्या नादात सूरज महेंद्र पाटील (वय २१ रा भूषण कॉलनी) या तरुणाची २८ हजारात ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना सोमवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली .

सुरज हा पुण्याला अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. पाच वर्षांपूर्वी त्याने बारा हजार रुपयांची जीम की सायकल खरेदी केली होती. ही सायकल विक्री करायची असल्याने त्याने सोमवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास ओएलएक्स या साइटवर सायकलचे छायाचित्र अपलोड करुन जाहिरात टाकली.

जाहिरात टाकताच सूरजला राकेश शर्मा नावाच्या व्यक्तीचा मोबाईलवर फोन आला. त्याने सायकल खरेदी करायचे असून तुम्हाला पाठवलेल्या क्यूआर कोड स्कॅन करा त्यानंतर तुम्हाला संबंधित सायकलची रक्कम मिळेल असे सांगितले.

सूरजने क्यूआर कोड स्कॅन करताच त्याच्या बँकेच्या खात्यावरुन अर्ध्यातासाच्या अंतरात दोन वेळा तीन हजार व दोन वेळा ११ हजार याप्रमाणे एकुण २८ हजार रुपये काढण्यात आल्याचे संदेश मोबाईलवर प्राप्त झाले.

पैसे परत करण्याच्या बहाण्याने सूरजला संबंधितांचे फोन येत आहेत. आपली ऑनलाईन फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर सूरजने तक्रारीसाठी रामानंदनगर पोलिस स्टेशन गाठले आहे.

Share post
Tags: Crime newsDivya JalgaonDivya Jalgaon NewsFroudJalgaon crime newsJalgaon Marathi NewsJalgaon newsओएलएक्सवर सायकल विकणाऱ्या तरुणाची फसवणूक
Previous Post

दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी यांना करोनाची लागण

Next Post

एकनाथराव खडसेंनी मागितली ब्राह्मण समाजाची माफी

Next Post
Breaking : माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना ईडीची नोटीस

एकनाथराव खडसेंनी मागितली ब्राह्मण समाजाची माफी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group