Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

एकनाथराव खडसेंनी मागितली ब्राह्मण समाजाची माफी

by Divya Jalgaon Team
November 9, 2020
in जळगाव, राजकीय
0
Breaking : माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना ईडीची नोटीस

जळगाव – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी ब्राह्मणांसंदर्भात केलेल्या वक्त्यावरुन माफी मागीतली आहे. ब्राह्मण बांधवांच्या भावना दुखावण्याचा आपला कोणताही हेतू नव्हता असं खडसेंनी ट्विटरवरुन स्पष्ट केलं आहे. मी कायमच ब्राह्मणांचा आदर केला आहे, असंही खडसे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

एकनाथ खडसे यांनी ट्विटवरुन ब्राह्मण समाजासंदर्भात केलेल्या वक्त्यावरुन माफी मागितली आहे. “दि. ६ नोव्हेंबर २०२० रोजी मी सभेमध्ये जे बोललो, त्याचा विपर्यास केला गेला. ब्राह्मण समाजासह अन्य सर्वच समाजांचा मी माझ्या राजकीय आयुष्यात नेहमीच आदर केला आहे. झालेल्या विपर्यासामुळे ब्राह्मण समाजातील बांधवांच्या भावनांना जर ठेच पोहचली असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो,” असं खडसेंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दि. ६ नोव्हेंबर २०२० रोजी मी सभेमध्ये जे बोललो, त्याचा विपर्यास केला गेला. ब्राह्मण समाजासह अन्य सर्वच समाजांचा मी माझ्या राजकीय आयुष्यात नेहमीच आदर केला आहे. झालेल्या विपर्यासामुळे ब्राह्मण समाजातील बांधवांच्या भावनांना जर ठेच पोहचली असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो.

आपण भाजपा का सोडली याच कारण सांगताना खडसे यांनी, “भाजपानं एका व्यक्तीच्या लाडापोटी माझ्यासारख्यांना बाजूला केलं. एका व्यक्तीमुळे सरकारचं वाटोळं झालं. या अशा लोकांमुळे मला भाजपा सोडवी लागली. जिथे आपलेच गद्दार होतात त्या घरात राहून काय उपयोग आहे. यांच्यापेक्षा दिलदार शत्रू बरा. कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा,” असं म्हटलं होतं. “मी अख्खं आयुष्य भारतीय जनता पक्षाला दिलं. माझा मुलगा गेला तरीही मी भाजपाशी एकनिष्ठ राहिलो. पण मला एका माणसानं छळलं” अशा शब्दांत त्यांनी आपल्या मनातील खंत पुन्हा एकदा बोलून दाखवली.

Share post
Tags: #Brahman SamajEknathrao Khadse NewsJalgaon Marathi NewsJalgaon newsjalgaon political newsMuktainagarPolitical NewsTweetएकनाथराव खडसेंनी मागितली ब्राह्मण समाजाची माफीब्राह्मण समाजाची माफी
Previous Post

ओएलएक्सवर सायकल विकणाऱ्या तरुणाची फसवणूक

Next Post

गेंड्याच्या कातडीचे सरकार – आ. गिरीश महाजन

Next Post
कोरोना हाताळण्यात राज्य सरकार १०० टक्के अयशस्वी

गेंड्याच्या कातडीचे सरकार - आ. गिरीश महाजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group