पारोळा – पारोळा तालुक्यातील टोळी येथील दलित तरूणीचे अपहरण करून तिच्यावर तीन जणांनी सामूहिक अत्याचार केला, तसेच त्यांनी तिला विष पाजले. अशा बेशुद्धावस्थेत ती पारोळा येथील बसस्थानकाच्या मागे पडलेली सापडली. त्यामुळे तिला बेशुद्धावस्थेतच आधी पोरोळा रुग्णालयात दाखल केले,
नंतर हिरे शासकिय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात तिला हलविण्यात आले होते. या दरम्याने मंगळवारी पहाटे चार वाजता तिचा मृत्यू झाला. या प्रकरणातील मुुख्य आरोपीने सोमवारी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावरही धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सदर प्रकरणी चार जणांवर पारोळा पोलिस ठाण्यात अपहरण, सामूहिक अत्याचारासह अनुसुचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अॅट्रॉसिटी अॅक्ट) गुन्हा दाखल झाला. यात एका महिलेचाही समावेश आहे. तर, पोलिसांनी टोळी येथील दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.
या पाश्र्वभूमीवर रात्री उशीरा टोळी (ता. पारोळा) येथील पिडीत तरूणीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.