जळगाव – उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या उपमहापौर पदासाठी सुनील खडके यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आज उपमहापौर निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत भाजपचे सुनील खडके यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.
उपमहापौरपदाची निवड जिल्हाधिकारी तथा पिठासीन अधिकारी अभिजित राऊत यांनी घोषित केली. यावेळी महापौर भारती सोनवणे, आमदार राजूमामा भोळे, भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष उज्वला बेंडाळे, भाजपा महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, भाजपा गटनेते भगत बालाणी, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, सदाशिव ढेकळे, माजी नगरसेवक वामनराव खडके, विरोधी पक्ष नेता सुनील महाजन, शिवसेनेचे गटनेते अनंत जोशी, नगरसेवक विष्णू भंगाळे, नितीन बरडे, प्रशांत नाईक, गणेश सोनवणे, नगरसेविका रेश्मा काळे, शुचिता हाडा, सरिता नेरकर, कैलास सोनवणे, चेतन सनकत, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी सुनील खडके यांनी उपमहापौरपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर ग्वाही दिली की, “भारतीय जनता पार्टीने संधी दिल्याने त्यांचे आभार मानतो, आ. गिरीश महाजन व रक्षा खडसे यांच्या आशीर्वादाने हे पद मला प्राप्त झाले आहे. जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजूमामा भोळे, शहराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, सर्व नगरसेवक, कार्यकर्ते यांचे सहकार्य लाभल्याने मी या पदावर विराजमान झालो आहे. मी शहराच्या विकासासाठी प्रयत्नशील राहील.