जळगांव – जळगांव शहरातील मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने स्वतंत्र सेनानी व भारत देशाचे पाहिले शिक्षणमंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची १३३ वी जयंती निमित्त बेघर निवारा केंद्र, चिमुकले राममंदिर, बस स्थानक, सिंधी कॉलनी,रेल्वे स्टेशन अश्या विविध ठिकाणी गरजू व रस्त्याच्या आश्रयाने राहणारे गरीब गरजु वयोवृद्ध नागरिकांना १२० ब्लेंकेट वाटप करून अल्पस्वरूपात मायेची उब दिली आहे.
थंडीचे जास्त प्रमाणात वाढ होत आहे.अश्या वेळी रस्त्याच्या कडेला राहणारे मंदिर,मजीद, बस स्थानक, रेल्वे स्टेशन या परिसरात वयोवृद्ध यांना रात्र कुडकुडत काढावी लागत आहे.त्यांना ब्लेंकेट वाटप करून माणुसकीची उब मिळावी यासाठी हे स्तुत्य उपक्रम राबविण्यात आले.तसेच इतर संस्था व नागरिकांनी पण अश्या उपक्रमात सहभागी होऊन गरजूंना मदत करावी असे मनोगतात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष फिरोज शेख यांनी सांगितले.
सर्व प्रथम मौलाना आझाद यांच्या प्रतिमेस गायत्री पाटील (शहरी अभियान निरीक्षक,महानगरपालिका, जळगांव) यांच्या हस्ते माल्यार्पण करून जयंती साजरी करण्यात आली.उपस्थित मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली.
या उपक्रमाला पेप्सी कंपनीचे नानकदास तलरेजा,कमलकेशव प्रतिष्ठानच्या अध्यक्षा भारती म्हस्के,श्री.स्वामी समर्थ स्कूलच्या मुख्यध्यापिका सौ. हर्षाली पाटील, यांचे अनमोल सहकार्य लाभले.या वेळी उपस्थित मौलाना आझाद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष फिरोज शेख, स्वप्नसाकार फाऊंडेशनच्या अध्यक्षा भारती काळे, कमलकेशव प्रतिष्ठानचे सचिव अँड.अभिजित रंधे,जे.सि.आय.चे जिनल जैन,चंद्रशेखर कापडे,मोनाली कुमावत,राकेश कंडारे, राजेंद्र मराठे,अस्लम मण्यार,गणेश जोशी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन मनोज भालेराव तर आभार जिनल जैन यांनी केले.