Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

मुंबई इंडियन्सने पटकवले पाचवे आयपीएल विजेतेपद

by Divya Jalgaon Team
November 11, 2020
in क्रीडा, राष्ट्रीय
0
मुंबई इंडियन्सने पटकवले पाचवे आयपीएल विजेतेपद

दुबई-  युएईच्या दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटलचा पराभव करत आयपीएलमधील विक्रमी पाचवे विजेतेपद पटकावले. दिल्लीविरुद्धच्या या सामन्यात दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.मुंबई इंडियन्सने पटकवले पाचवे आयपीएल विजेतेपद.

मुंबई इंडियन्सने पटकवले पाचवे आयपीएल विजेतेपद. त्याचा निर्णय चुकीचा ठरला आणि संघाने २२ धावा देऊन तीन गडी गमावले पण त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि यष्टीरक्षक ऋषभ पंत यांच्या फिफ्टीच्या जोरावर संघाने मुंबई इंडियन्ससमोर १५७ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य ठेवले. दिल्लीकडून १५७ धावांचे लक्ष्य असताना मुंबई इंडियन्सने चांगली सुरुवात केली. संघासाठी कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक ६८ धावा केल्या. त्याच्याशिवाय ईशान किशनने ३३ धावा केल्या. दिल्लीकडून एनिच नॉर्तेने दोन तर कॅगिसो रबाडा आणि मार्कस स्टोइनिस यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

रोहित हा आयपीएलमधील एकमेव यशस्वी खेळाडू आणि कर्णधार आहे. रोहित आतापर्यंत एकूण ६  वेळा आयपीएलच्या अंतिम सामन्यात खेळला आहे. रोहित १ वेळा खेळाडू तर ५ वेळा कर्णधार म्हणून अंतिम सामन्यात खेळला आहे. या सहाही वेळा तो यशस्वी झाला आहे. रोहित २००९ मध्ये हैदराबादकडून खेळत होता. तेव्हा अंतिम सामना हैदराबाद विरुद्ध बंगळुरु यांच्यात खेळण्यात आला होता. या अंतिम सामन्यात हैदराबादने बंगळुरुवर विजय मिळवला होता.

रोहितला २०१३  मध्ये मुंबई इंडियन्स संघात समाविष्ट करण्यात आलं. रोहित तेव्हापासून मुंबईचे नेतृत्व करतोय. तेव्हापासून ते आतापर्यंत मुंबईने एकूण ५  वेळा अंतिम सामन्यात धडक मारली. आणि विजेतेपद पटकावलं. मुंबईच्या या ५ वेळच्या विजेतेपदात रोहितने कर्णधार म्हणून महत्वाची भूमिका बजावली आहे.

अजून वाचा 

आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या आयोजनासाठी सकारात्मक – सौरव गांगुली

Share post
Tags: #Dubai Marathi news#IPL Marathi newsDivya Jalgaon NewsDubai newsIPL NewsMumbai IndiansSport NewsWinnerमुंबई इंडियन्सने पटकवले पाचवे आयपीएल विजेतेपद
Previous Post

मौलाना आझाद जयंती निमित्त शहरात ब्लेंकेट वाटप

Next Post

नितीश कुमार पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री

Next Post
नितीश कुमार पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री

नितीश कुमार पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group