जळगाव – गेल्या अनेक काही वर्षापासून सकल मराठा समाज क्रीडा क्षेत्रात मधील वेगवेगळ्या खेळात जळगाव जिल्हयाचे नाव भारतात नेत आहे. त्याअनुषंगाने समाजातील होतकरू मुलांना एक अधिकृत क्रीडा क्षेत्रातील व्यासपीठ उपलब्ध व्हावे, ही समाजातील काही जेष्ठ नागरिक किंवा क्रीडापटूची इच्छा होती त्यानुसार काही जण एकत्र येऊन जळगाव जिल्हा मराठा स्पोर्ट फाउंडेशनची स्थापना करावी आणि त्या स्पोर्ट फाउंडेशनच्या अंतरंगत समाजातील जळगाव जिल्हातील सर्व मुलांना न्याय दिला जावा हा हेतू या मागे आहे.क्रीडा क्षेत्रासाठी जळगाव जिल्हा मराठा स्पोर्ट फाउंडेशनची स्थापना.
प्रथम स्पोर्ट फाउंडेशनच्या लोगोचे अनावरण तसेच कार्यपुस्थिकेचे करण्यात आले, त्यानंतर बैठकीत पुढील नियोजन करण्यात आले . त्यामध्ये मुलांना क्रीडा क्षेत्रात मधील लागणारे वेगवेगळे साहित्य,खेळाडूचे विमा कवच,त्यांचा प्रवास खर्च,किंवा जिथे ज्या मुलाचा खेळ आहे तिथे राहायची व्यवस्था हि सर्व नियोजनात्मक चर्चा आज झाली तसेच सकल मराठा समाजातर्फे पुढील काळात जळगाव जिल्ह्यातील मराठा समाजातील शाहिद सैनिकांच्या वारसांना मदत निधी,वधू वर परिचय मेळावे,सर्व जळगाव जिल्ह्यातील व्यावसायिकांची डिक्शनरी,MPSC व UPSC च्या मुलांना अभ्यासासाठी लागणारे साहित्य, मराठा क्रिकेट लीग इत्यादी विषयावर चर्चा करण्यात आली.
तसेच जळगाव जिल्हा मराठा स्पोर्ट फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात अध्यक्ष इंजि.शंभू सोनवणे, कार्याध्यक्ष गोपाळ दर्जी, सचिव सागर पाटील, खजिनदार जयांशु पोळ, तसेच सदस्य म्हणून महापालिकेचे नगरसेवक सचिन पाटील ,निलेश पाटील,चंद्रशेखर पाटील ,सुनील सोनवणे दीपक आर्डे यांचा समावेश आहे, याप्रसंगी जिल्ह्याचे उदयॊजक प्रा.डी.डी.बच्छाव ,श्रीराम पाटील, भाऊसाहेब सुरेश पाटील, आबासाहेब कापसे , अभिषेक पाटील, दीपक सूर्यवंशी, गोपाळ दर्जी, डॉ. अजित वाघ ,तसेच समाजातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
अजून वाचा
पद्मालय देवस्थान आजपासून दर्शनासाठी खुले