Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

धक्कादायक : विवाहितेवर सलग 18 दिवस केला नराधमाने अत्याचार

नाशिक जिल्ह्यात 20 वर्षीय विवाहितेचे अपहरण; जिल्ह्यात खळबळ

by Divya Jalgaon Team
November 15, 2020
in गुन्हे वार्ता, राज्य
0
धक्कादायक! महिलेला दारु पाजून चार दिवस केला सामूहिक बलात्कार

नाशिक : एकीकडे संपूर्ण राज्यभरात दिवाळीचा उत्साह असताना नाशिकमधून मात्र खळबळजनक बातमी समोर येत आहे. सटाणा इथून एका महिलेचं अपहरण करुन तिच्यावर 4 नराधमांनी तब्बल 18 दिवस सामुहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे.

नक्की काय घडला प्रकार?

शहरात केळी विकण्याचा व्यवसाय करणारी 20 वर्षीय विवाहीत महिला मॉर्निंग वॉकसाठी घरातून बाहेर पडली होती. त्यावेळी 4 नराधमांनी तिचं अपहरण केलं. 21 ऑक्टोबर 2020 रोजी ही घटना घडली. महिलेचं अपहरण करुन त्यांनी तिला मोटार सायकलवरुन दोधेश्वरच्या जंगलात पळवून नेलं. तिला जबरदस्तीने दारु पाजून हे नराधम तब्बल 18 दिवस तिच्यावर अत्याचार करत होते. 8 नोव्हेंबर रोजी त्या महिलेला कशीबशी आपली सुटका करुन घेण्यात यश आलं. आणि तिने थेट पोलीस ठाणं गाठलं. याप्रकरणी सटाणा पोलिसांनी मुळाणे इथल्या 4 आरोपींना अटक केली आहे. संदीप नाडेकर वय 40, सचिन तानाजी खोताडे वय 32, पप्पू बंडू नाडेकर वय 36 आणि भगवान गवळी (38) अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली आहे.

21 ऑक्टोबर रोजी अपहरण झाल्यानंतर तिच्या सासरच्यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती. त्यामुळे पोलीस तिचा आधीपासूनच शोध घेत होते. 8 नोव्हेंबरला मुलगी घरी आल्याची माहिती तिच्या माहेरच्या मंडळींनी दिली. त्यानंतर पीडितेनं तिच्यासोबत घडलेला सगळा प्रकार सांगितला आणि पोलिसांच्या तपासाला वेग आला. या महिलेला आरोपींचा मोबाईल नंबर मिळाला होता. त्या मोबाईलवरुन आरोपींचं लोकेशन ट्रेस करण्यात आलं. लोकेशननुसार पोलिसांनी त्यांच्या जंगलातील घरावर छापा मारला आणि पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली. यावेळी त्यांच्या घरातून काही दारुच्या बाटल्या आणि आक्षेपार्ह वस्तूही जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला असून त्यांना 16 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

नुकतंच लक्ष्मीपूजन पार पडलं. एकीकडे आपण देवी म्हणून स्त्रीची पूजा करतो आणि दुसरीकडे असले समाजकंटक अद्यापही महिलांचं संपूर्ण आयुष्य उदद्धस्त करतात. अशा नराधमांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे.

अजून वाचा 

नोंदणी नसलेल्या मुंबईतून आलेल्या ३० दुचाकी केल्या जप्त

Share post
Tags: #Nashik crime newsBreaking newscrimeCrime newsDivya Jalgaon NewsMarathi NewsNashik Latest Newsधक्कदायक : नाशिक जिल्ह्यात 20 वर्षीय विवाहितेचे अपहरण
Previous Post

शेंदुर्णी येथील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

Next Post

ज. जि. म. स. बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यांना कोरोनाची लागण

Next Post
रोहिणी खडसे यांनी केली कोरोनावर मात

ज. जि. म. स. बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यांना कोरोनाची लागण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group