शेंदुर्णी, ता. जामनेर प्रतिनिधी । शेंदुर्णी येथील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश केला. पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष मनोहर पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. शेदुर्णी येथील अनेक तरुणांसह नागरिकांनी शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉ.मनोहर पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला.
यात विजय पाटील,मच्छिंद्र कुमावत,लखण कुमावत,अजय मोची,सोनु गुजर, मयुर बारी, राकेश कुमावत, विकास पाटील, संदीप बारी, रतन माळी, सुकलाल भोई, भरत भोई, वैभव माळी, विशाल पाटील, अक्षय बारी, किरण कुमावत, पंकज तायडे, आकाश चौधरी, ओम पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी शहर प्रमुख संजय गुजर यांनी दिवाळीच्या महापर्वीचे औचित्यसाधुन वार्ड क्रमांक ९ मध्ये नवीन शाखेचे उद्घाटन डॉ.मनोहर पाटील यांच्या हस्ते केले.
यावेळी विधानसभा क्षेत्र प्रमुख रविंद्र पांढरे, विनोद नाईक,पहुर शहर प्रमुख सुकलाल बारी,युवासेना अॅड. भरत पवार,विभाग प्रमुख गणेश पांढरे,अतुल सोनवणे, भाऊराव गोधनखेडे तसेच शेंदुर्णी येथील उपशहर प्रमुख बारकु जाधव,अशोक बारी,राजु पाटील,सिध्देश्वर पाटील,विलास पाटील आदी मान्यवर सह शिवसैनिक उपस्थित होते. कार्यक्रम शेदुर्णी येथील खंडेराव मंदीर जवळ आयोजित करण्यात आला होता. डॉ.सुनील अग्रवाल यांनी सुत्रसंचालन केले.बारकु जाधव यांनी आभार मानले.