कराड : ‘लागिर झालं जी’ या मालिकेतील जिजी ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्री कमल ठोके यांचं दीर्घ आजाराने निधन झालं आहे. ऐन दिवाळीत त्यांच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. मराठी कला क्षेत्रात ज्येष्ठ अभिनेत्री आणि माजी मुख्याध्यापिका श्रीमती कमल ठोके अशी त्यांची ओळख आहे.’लागिर झालं जी’ मालिकेतील ज्येष्ठ अभिनेत्री कमल ठोके यांचे निधन.
प्रसिद्ध मालिका लागिर झालं जी मधून कमल ठोके यांनी प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवली. त्या 74 वर्षांच्या होत्या. 14 नोव्हेंबरला संध्याकाळी बंगळुरू इथं त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मराठी सिनेसृष्टीत जीजी अशी कमल ठोके यांची ओळख आहे. कलम यांच्या कराड इथल्या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या अशा जाण्यामुळे चाहत्यांनीही हळहळ व्यक्त केली आहे.’लागिर झालं जी’ मालिकेतील ज्येष्ठ अभिनेत्री कमल ठोके यांचे निधन.
मल ठोके हे गेल्या काही दिवसांपासून कर्करोगाने आजारी होत्या. बंगळुरू इथं त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण अखेर 14 नोव्हेंबरला त्यांनी अखेरचा श्वास घेतला. खरंतर, कमल यांचा अभिनयातील प्रवासही मोठा होता. 1992 मध्ये त्यांनी सिनेसृष्टीमध्ये काम करण्यास सुरुवात केली. बरं इतकंच नाही, यावेळी त्या कराडमध्ये शिक्षिकादेखील होत्या.
कमल यांनी अनेक अजरामर भूमिका साकराल्या आहेत. त्यांच्या प्रत्येक पात्रं प्रेक्षकांच्या मनात भरली. बाबा लगीन, माहेरचा आहेर, सख्खा भाऊ पक्का वैरी, ना. मुख्यमंत्री गावडे अशा अनेक गाजलेल्या मराठी सिनेमांतून कमल यांनी आपला अभिनय लोकांपर्यंत पोहोचवला. अभिनयासोबतच कमल यांना शिक्षणाचीही ओढ होती. यामुळे त्यांनी जुद्दीने आपलं शिक्षण पूर्ण करत शिक्षिकेचंही काम केलं.
कमल ठोके यांचे पती गणपती ठोके हेदेखील शिक्षक आहे. गणपती ठोके यांनीही कायम कमल यांना त्यांची आवड-निवड जोपासण्यासाठी पाठिंबा दिला. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण कमल ठोके यांनी तब्बल 33 वर्ष शिक्षिका म्हणून नोकरी केली आहे. अशात त्यांनी अभिनय आणि संगिताची आवड कधीच मागे नाही राहू दिली. त्यांच्या जाण्यामुळे सगळ्यांच्याच मनाला चटका लागला आहे.
अजून वाचा
रानू मंडलला मिळाली आणखी एक संधी