Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

वयोवृद्ध नागरिक, लहान मुले, गर्भवतींना प्रार्थनास्थळी प्रवेशबंदी

प्रतिबंधित क्षेत्रातील धार्मिकस्थळे बंदच

by Divya Jalgaon Team
November 15, 2020
in राज्य
0
वयोवृद्ध नागरिक, लहान मुले, गर्भवतींना प्रार्थनास्थळी प्रवेशबंदी

पंढरपूर – पंढरपूर येथे वारकरी पाईक संघटनेचे ह.भ.प. राणा महाराज व इतरांनी लाडू वाटप करून मंदिरे उघडण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. प्रार्थनास्थळे सुरू होत असली तरी ६५ वर्षांवरील नागरिक, १० वर्षांखालील मुले, व्याधीग्रस्त तसेच गर्भवतींनी घरीच थांबावे, खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी धार्मिकस्थळांमध्ये जाणे टाळावे, असे आवाहन करणाऱ्या मार्गदर्शक सूचना राज्य सरकारने शनिवारी जारी केल्या. या सूचनांचे धार्मिकस्थळांचे व्यवस्थापन करणाऱ्या संस्थांनी कठोर पालन करावे, असेही बजावण्यात आले आहे.वयोवृद्ध नागरिक, लहान मुले, गर्भवतींना प्रार्थनास्थळी प्रवेशबंदी.

करोना नियंत्रणासाठी विविध उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी तसेच सामाजिक अंतर पाळूनच धार्मिक किं वा प्रार्थना स्थळांमध्ये भाविकांना प्रवेश देण्याचे आदेश राज्य सरकारने धार्मिक स्थळ व्यवस्थापनांना दिले आहेत. त्यानुसार मुखपट्टीचा वापर, धार्मिकस्थळी प्रवेश करण्यापूर्वी हातांचे र्निजतुकीकरण बंधनकार करण्यात आले आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील धार्मिकस्थळे बंदच राहणार आहेत.

ज्येष्ठ नागरिक, गर्भवती, लहान मुले किंवा व्याधीग्रस्तांनी मंदिर प्रवेश टाळावा, असे सरकारने स्पष्ट केले आहे. परंतु, या वर्गातील नागरिकांना रोखण्याची सक्ती केलेली नाही. मात्र मंदिरांचे व्यवस्थापन करणाऱ्यांनी या वर्गातील नागरिकांना प्रवेश देऊ नये, असे सरकारने म्हटले आहे.

* मंदिरे, मशिदी, चर्च किंवा अन्य धार्मिकस्थळी सबंधित व्यवस्थापनाने निर्धारित केलेल्या वेळेत आणि निर्धारित केलेल्या संख्येप्रमाणे भाविकांना प्रवेश.

* सर्व धार्मिक स्थळे तसेच प्रार्थना स्थळांमध्ये येणारे भाविक आणि पर्यटकांनी मुखपट्टी वापरणे बंधनकारक.

* धार्मिक स्थळ परिसरात अंतर नियमाचे पालन आवश्यक, थर्मल स्कॅनिंग, जंतूनाशके ठेवणे आवश्यक.

* दर्शन रांगेत दोन व्यक्तींमध्ये किमान सहा फूट अंतर अत्यावश्यक.

* थुंकण्यास सक्त मनाई, मंदीरात प्रवेश करताना साबणाने हात-पाय स्वच्छ धुणे किंवा जंतूरोधकाने हातांचे र्निजतुकीरकण बंधनकारक

* आजाराची कोणतेही लक्षणे नसलेल्यांनाच प्रवेश द्यावा.

* धार्मिक स्थळी करोनाबाबत जनजागृती करणारी व्यवस्था व्यवस्थापनाने उभारावी

* दर्शनासाठी जागा निश्चिती करावी, त्यानुसार जागा चिन्हांकित (मार्किं ग) कराव्यात.

* प्रवेशासाठी आणि बाहेर जाण्यासाठी स्वतंत्र दरवाजे असावेत.

* मुर्ती, पुतळ्यांना हात लावण्यास तसेच भजने, आरती करण्यास परवानगी नाही.

* कोणत्याही धार्मिक ठिकाणी प्रसाद वाटपास मनाई.

* सामूहिक प्रसादाची (भोजनाची)व्यवस्था असणाऱ्या ठिकाणी नियम अंतर पाळून प्रसाद वाटपास परवानगी

अजून वाचा 

Breaking: सोमवारपासून मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळे उघडणार

Share post
Tags: #maharashtra news#Padharpur latest news#Pandharpur marathi newsDivya Jalgaon NewsMarathi Newsगर्भवतींना प्रार्थनास्थळी प्रवेशबंदी - राज्य सरकारलहान मुलेवयोवृद्ध नागरिक
Previous Post

आजचे राशीभविष्य, रविवार, १५ नोव्हेंबर २०२०

Next Post

‘लागिर झालं जी’ मालिकेतील ज्येष्ठ अभिनेत्री कमल ठोके यांचे निधन

Next Post
'लागिर झालं जी' मालिकेतील ज्येष्ठ अभिनेत्री कमल ठोके यांचे निधन

'लागिर झालं जी' मालिकेतील ज्येष्ठ अभिनेत्री कमल ठोके यांचे निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group