मुंबई – सोमवारपासून मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळे उघडणार. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रात देखील लॉकडाऊन करण्यात आले होते. याच पाश्र्वभूमीवर शाळा महाविद्यालये, रेल्वे, धार्मिक स्थळे तसेच कार्यालये असे सर्व ठिकाणी बंद करण्यात आली होती.
मात्र राज्यात अनलॉकची प्रक्रिया राबविण्यात आल्याने काही नियम आणि अटी शिथिल करण्यात आल्या होत्या. म्हणून चोहीकडून मंदिरे उघडण्यासाठी आंदोलने करण्यात आली. यामुळे दिवाळी पाडव्यापासून म्हणजेच सोमवारपासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे.Breaking: सोमवारपासून मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळे उघडणार.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, हा फक्त सरकारी आदेश नसून ‘श्रीं ची इच्छा समजा. अनलॉकची प्रक्रिया सुरू असली तरी राज्यातील मंदिरं मात्र उघडण्यास परवानगी देण्यात आली नव्हती. अनलॉकमध्ये बहुतेक सर्वच बाबी सुरु झाल्याने राज्यातील मंदिरंही खुली करावीत अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. याची दखल घेत अखेर ठाकरे सरकारने दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सर्व धार्मिक स्थळं उघडण्याचा निर्णय घेतला आहे.
करोनाच्या काळात सर्वच प्रार्थनास्थळे बंदी असली तरी डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्ड बॉयच्या रूपाने ‘देव’ पांढऱ्या कपड्यांत भक्तांची काळजी वाहत होता. देव आपल्यातच होते, पण आता उद्याच्या पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरांसह सर्व प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र नियम, शिस्तीचे काटेकोर पालन सगळ्यांना करावेच लागेल. मुख्य म्हणजे प्रत्यक्ष प्रार्थनागृहांतील गर्दी टाळा व स्वतःबरोबर इतरांचे रक्षण करा, असे आवाहन देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
अजून वाचा
कृषीच्या माहितीसाठी व्हाटस्ॲप आणि ब्लॉगचा वापर – कृषीमंत्री भुसे