Tuesday, May 5, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

अंगारकी चतुर्थीनिमित्त पद्मालय येथे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते अभिषेक व महापूजा

by Divya Jalgaon Team
May 5, 2026
in जळगाव, सामाजिक
0
अंगारकी चतुर्थीनिमित्त पद्मालय येथे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते अभिषेक व महापूजा

जळगाव  – पद्मालय गणपती मंदिर येथे अंगारकी चतुर्थीच्या पावन निमित्ताने पहाटेच्या मंगलमय वातावरणात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते अभिषेक, विधिवत पूजा व आरती संपन्न झाली. पहाटे ४ वाजता पार पडलेल्या या पूजेमुळे मंदिर परिसर भक्तिमय झाला होता.

पद्मालय हे गणपतीचे अत्यंत प्राचीन व जागृत स्थान मानले जाते. विशेष म्हणजे डाव्या व उजव्या सोंडेचे गणपती एकाच ठिकाणी विराजमान असलेले हे देशातील एकमेव मंदिर आहे. संकष्टी, अंगारकी चतुर्थीच्या दिवशी येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात. पद्मालय देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या निमंत्रणाचा स्वीकार करुन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी आज पहाटे विधिवत पूजा व आरती केली. व त्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. यावेळी मंदिराचे पुजारी गणेश वैद्य व केशवराव पुराणिक यांनी विधीपूर्वक पूजा सांगितली. पूजा संपल्यानंतर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी मंदिराचा इतिहास तसेच सुरू असलेल्या विकास कामांची माहिती घेतली.

श्री गणपती मंदिर देवस्थान पद्मालय ट्रस्टतर्फे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा शाल व गणरायाची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी विश्वस्त आनंदराव पाटील, भिका पाटील, गोकुळ देशमुख, डॉ. पांडुरंग पिंगळे, राजेश तिवारी, अर्जुन पाटील, शिरीष बर्वे यांच्यासह तहसीलदार गोपाल पाटील, जैन इरिगेशनचे अनिल जोशी व इतर मान्यवर उपस्थित होते. देवस्थानचे सहकारी अशोक पाटील व जोशी यांनी पूजेचे नियोजन केले. संकष्टी, अंगारकी चतुर्थीच्या दिवशी पद्मालय येथे होणारा हा धार्मिक सोहळा भाविकांसाठी श्रद्धेचा असतो. उन्हाची तिव्रता लक्षात घेता भाविकांसाठी पद्मालय देवस्थान तर्फे सावलीसाठी मंडपाची तसेच कुलर व थंड पाण्याची व्यवस्था ठिकठिकाणी करण्यात येते.

Share post
Tags: #AngarkiChaturthi#BreakingNews#Devotion#GaneshTemple#GanpatiBappa#GanpatiDarshan#JalgaonNews#Padmalaya#ReligiousNews#RohanGhugeMaharashtra
Previous Post

“उपमहापौर मनोज चौधरी यांच्या पुढाकाराने कचरा समस्येवर तोडगा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group