Thursday, May 7, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आंब्यांच्या ‘मॅंगो फिएस्टा’ प्रदर्शनाचे अशोक जैन यांच्या हस्ते उद्घाटन उत्साहात

by Divya Jalgaon Team
May 7, 2026
in कृषी विषयी, जळगाव, तंत्रज्ञान
0
आंब्यांच्या ‘मॅंगो फिएस्टा’ प्रदर्शनाचे अशोक जैन यांच्या हस्ते उद्घाटन उत्साहात

जळगाव – जैन हिल्स परिसरात लागवड केलेल्या आंब्यांपैकी तब्बल १६० जातींच्या आंब्यांचे प्रदर्शन शिरसोली रोड वरील गौराई ग्रामोद्योग च्या भव्य दालनात आंबा प्रदर्शन ‘मॅंगो फिएस्टा’ चे ७ मे रोजी जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन यांनी फित सोडून औपचारिक उद्घाटन झाले.

याप्रसंगी दिल्ली येथील इंडियन पोटॅश लिमिटेडचे जनरल मॅनेजर यू. एन. सिंग, स्वरुप लुंकड, आंतरराष्ट्रीय आंबा तज्ज्ञ डॉ. रामचंद्र गुंजाटे, अतुल जैन, सौ. ज्योती जैन, सौ. शोभना जैन, अंबिका जैन, अन्मय जैन, जैन परिवारातील सदस्य, त्याच प्रमाणे डॉ. अनिल ढाके, डॉ. बी. के. यादव, डॉ. के.बी. पाटील, डॉ. निर्मल बाबू, बी.डी. जडे, शंकर गाडेकर, नितीन पाटील, अजय काळे यांच्यासह सर्व सहकारी उपस्थित होते. प्रथम अशोक जैन व ज्योती जैन यांच्याहस्ते आंबावृक्षाचे विधिवत पूजन करण्यात आले.

हे ‘मॅंगो फिएस्टा’ प्रदर्शन आज ०८ व ०९ मे पर्यंत सकाळी ९ ते रात्री १० वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले आहे. जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीच्या शेती संशोधन विकास प्रात्यक्षिक केंद्रातर्फे आंब्या वरील सुरू असलेले संशोधन कार्य अधोरेखित करणाऱ्या ह्या प्रदर्शनात भारतासह विदेशातील १६० हून अधिक नामांकित प्रजातीच्या आंबाच्या जाती आहेत.

जैन इरिगेशनद्वारा विकसीत केल्या टिश्यूकल्चरच्या १३ प्रजाती, जैन संकरित (हायब्रीड) आंब्याच्या ४९ प्रजाती आणि थायलँड, मेस्किको, युरोप, युएसए, ऑस्ट्रलिया, जपान, ब्राझील, इस्त्राईल या विदेशी आंब्याच्या वेगवेगळ्या जातींचे आंबे पाहण्याची संधी प्राप्त करून देण्यात आली आहे. विेशेष म्हणजे जगातील सर्वात महागडा आंबा म्हणून प्रसिद्ध असलेला मियाझाकि आंब्याला देखील प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘मँगो फिएस्टा-२०२६’ या प्रदर्शनास अवश्य भेट द्यावी असे आयोजकांतर्फे आवाहन करण्यात आले आहे.

Share post
Tags: (#Jain Irrigation) #जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन#agriculture#AgroEvent#AshokJain#Farmers#FruitFestival#JalgaonNews#MaharashtraNews#MangoExhibition#MangoFestival#MangoFiesta#MangoLoversJalgaon
Previous Post

अंगारकी चतुर्थीनिमित्त पद्मालय येथे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते अभिषेक व महापूजा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group