Tuesday, April 14, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली

सुरांतून निसर्गाचा स्पर्श जपणाऱ्या महान कलावंताचा निरोप

by Divya Jalgaon Team
April 14, 2026
in जळगाव, सामाजिक
0

जळगाव – भारतीय संगीताच्या आकाशातील अजरामर स्वरकन्या आशा भोसले यांच्या निधनाची बातमी मनाला चटका लावून गेली. त्यांच्या सुरांनी अनेक पिढ्यांचे आयुष्य समृद्ध केले, तर त्यांच्या गाण्यांमध्ये निसर्गाची कोमलता, मातीचा सुगंध आणि जीवनातील ओलावा कायम जाणवत राहिला. कविवर्य ना. धों. महानोर यांच्या काव्यातील मातीशी असलेली नाळ जशी जिवंत आहे, तशीच ती आशाताईंच्या स्वरांतूनही अनुभवायला मिळाली. त्यांच्या काही गाण्यांतून शेती, निसर्ग आणि मातीतल्या भावविश्वाचा सुगंध दरवळत राहिला, जणू काळजाशी जपलेली आपल्या भूमीची ओळखच. श्रद्धेय भवरलाल जैन यांच्या कार्यातून जसे जल, जमीन आणि शेतकऱ्यांशी नाते जपले गेले, तसेच आशाताईंच्या सुरांतूनही जीवनाशी असलेले नाते अधिक दृढ झाले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पहिल्या पदवी प्रदान सोहळा दि. ७ सप्टेंबर १९९३ ला झाला होता.

त्यावेळी आशाताई भोसले व ज्येष्ठ साहित्यीक भालचंद्र नेमाडेदादा यांना डिलीट पदवी प्रदान करण्यात आले होते. त्यावेळी जैन हिल्स येथे त्यांच्या भेटीचा तो प्रसंग आजही मनात ताजा आहे, साधेपणाने, प्रेमाने आणि आत्मीयतेने झालेला संवाद आजही स्मरणात कोरलेला आहे. त्यांच्या सुरांनी निसर्गाला आवाज दिला, मातीला अर्थ दिला आणि मनाला शांती दिली. अशी स्वरसम्राज्ञी आता आपल्यात नसली तरी त्यांचे गीतरूपी अस्तित्व सदैव जिवंत राहील.

अशोक भवरलाल जैन,
अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.

– स्वरसम्राज्ञी आशाताई भोसले यांच्यासमवेत श्रद्धेय भवरलालजी जैन, कविवर्य ना. धों. महानोर व मान्यवर (संग्रहित छायाचित्र दि. 07/09/1993)

Share post
Tags: #Asha Bhosle#Asha Bhosle tribute#Music Legend#Tribute News#अशोकभाऊजैन#अशोकभाऊजैनजलगाव#आशा भोसले#भारतीय संगीत#भावरलालभाऊजैन#मराठी बातमी#मोठेभाऊ#संगीतविश्व#स्वरसम्राज्ञीMarathi Newsश्रद्धांजली
Previous Post

जळगाव महामार्गावरील अतिक्रमणांवर मनपाचा हातोडा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group