Tuesday, April 14, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगावात मोफत डोळे तपासणी शिबिर

२२५ नागरिकांची तपासणी, चष्मे वाटप व मोतीबिंदू ऑपरेशनची सुविधा

by Divya Jalgaon Team
April 14, 2026
in जळगाव, शैक्षणिक
0

जळगाव (दिव्य जळगाव) – येथील इकरा आय.टी.आय ऑप्टोमेट्री सेंटर, उदासी आईज हॉस्पिटल व रोटरी ह्युमॅनिटी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने इकरा थिम कॉलेजच्या कॅम्पसमध्ये मोफत डोळे तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात एकूण २२५ नागरिकांची तपासणी करण्यात आली. गरजू रुग्णांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले तसेच मोतीबिंदूग्रस्त अनेक रुग्णांच्या मोफत ऑपरेशनची नोंदणी करण्यात आली.

शिबिराचे उद्घाटन माजी आमदार गुरमुख जगवानी यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी इकरा संस्थेचे अध्यक्ष डॉ. अ. करीम सालार होते. प्रमुख उपस्थितांमध्ये आय.टी.आयचे चेअरमन हाजी अ. मजीद झकेरिया, ॲड. अरुण धांडे, विश्वास सोनवणे, प्रो. वकार शेख, रितु राय सिंगाणिया, अमीन बादलीवाला, अ. रशीद शेख अमीर, प्रो. जफर शेख, एजाज मलिक, अजीज सालार, मुनाफ शेख, रामदास मोटे, नबी बागवान, अमजद पठाण, निजाम पहेलवान, अफजल खान जनाब, नजीर मुलतानी, रमील बादलीवाला आणि इरफान सालार यांचा समावेश होता.

डोळ्यांची तपासणी डॉ. एम. पी. उदासी, डॉ. राहूल उदासी, डॉ. रूखसार मुजावर आणि त्यांच्या टीमने केली. रक्त व लघवी तपासणीसाठी अल-हिंद संस्थेच्या मरीयम झकेरिया लॅबच्या अल्ताफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तपासण्या करण्यात आल्या. तसेच अवायझर, एलेमबीक आणि बी अँड एच या कंपन्यांकडून रुग्णांना औषधांचे वितरण करण्यात आले.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी आय.टी.आयचे प्राचार्य जुबेर मलिक, त्यांचे सहकारी आणि विद्यार्थ्यांनी मोलाचे योगदान दिले.

Share post
Tags: #आरोग्य सेवा#इकरा आयटीआय#उदासी आईज हॉस्पिटल#डोळे तपासणी शिबिर#मोतीबिंदू ऑपरेशन#मोफत आरोग्य शिबिर#मोफत चष्मे#रोटरी क्लब#समाजकार्यजळगाव
Previous Post

स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group