Sunday, April 19, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जामनेर सातपुडा हिरोजचा ‘अक्षय’ विजय

जळगाव क्रिकेट लिगला भव्य सुरुवात

by Divya Jalgaon Team
April 19, 2026
in क्रीडा, जळगाव
0
जामनेर सातपुडा हिरोजचा ‘अक्षय’ विजय

जळगाव – जळगाव क्रिकेट लिग 2026 चा शानदार शुभारंभ शनिवारी सायंकाळी उत्साहात झाला. या वेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री सुरेश जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. जैन ड्रीम स्पेसेसच्या भव्य क्रीडांगणावर झालेल्या या स्पर्धेमुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना मोठा मंच उपलब्ध झाल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

उद्घाटन सोहळ्यानंतर झालेल्या पहिल्याच सामन्यात जामनेर सातपुडा हिरोजने पाचोरा एसकेटी योद्धाजवर 6 विकेट्सनी शानदार विजय मिळवला. नाणेफेक जिंकून हिरोज संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि तो योग्य ठरवत प्रतिस्पर्धी संघाला 114 धावांवर रोखले. रामकृष्णा राठोड याने 3 बळी घेत उत्कृष्ट कामगिरी केली,

तर शतायू कुलकर्णीनेही त्याला भक्कम साथ दिली. 115 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना जामनेरच्या फलंदाजांनी आक्रमक खेळ केला. प्रध्दुम महाजनने 14 चेंडूत 34 धावा करत संघाला वेगवान सुरुवात करून दिली. त्यानंतर ललित पाटील (29) आणि नाबाद क्रिशी नाथानी (33) यांच्या खेळीमुळे संघाने सहज विजय मिळवला.

या सामन्यातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल रामकृष्णा राठोड याला ‘सामनावीर’ पुरस्कार देण्यात आला. विजेत्या संघाला 15 हजार रुपये, तर उपविजेत्या संघाला 8 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. जळगाव क्रिकेट लिगच्या या दमदार सुरुवातीमुळे पुढील सामने अधिक रंगतदार होणार असल्याची उत्सुकता क्रीडाप्रेमींमध्ये निर्माण झाली आहे.

Share post
Previous Post

जळगावात मोफत डोळे तपासणी शिबिर

Next Post

‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’

Next Post

‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group