Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

वर्षभराच्या आत छ. संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम सुरु करणार – आ. राजू मामा भोळे यांची घोषणा

by Divya Jalgaon Team
May 15, 2025
in जळगाव, सामाजिक
0
वर्षभराच्या आत छ. संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम सुरु करणार – आ. राजू मामा भोळे यांची घोषणा

जळगाव – सार्वजनिक छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने आज महाबळ जळगाव येथील छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहात महाराजांची जयंती अत्यंत प्रेरणादायी व शिवभक्तिपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार स्मिताताई वाघ होते तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार व समितीचे अध्यक्ष मा. राजू मामा भोळे यांची उपस्थिती होती.

या प्रसंगी छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समितीचे समन्वयक शंभू अण्णा पाटील यांनी आपल्या भाषणात जळगाव शहरात अद्यापही छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक अथवा पुतळा नसल्याबद्दल तीव्र खंत व्यक्त केली. आजच्या पिढीला प्रेरणा देणारे असे भव्य स्मारक निर्माण व्हावे असे मत व्यक्त केले. याप्रसंगी शहराचे आमदार राजू मामा भोळे यांनी शिवप्रेमींच्या भावना लक्षात घेऊन जळगाव शहरात वर्षभराच्या आत छ. संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामाला सुरवात करणारच अशी मोठी घोषणा केली. स्मारकाच्या कामासाठी गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सहकार्याने अतिशय उत्तम व भव्य स्मारक उभारले जाईल असे आश्वासन देण्यात आले.

तसेच यावेळी अरविंदभाऊ देशमुख यांनी स्वतःच्या घरी स्थापना करण्यासाठी पुणे येथून खास बनवून आणलेल्या संभाजी महाराजांच्या सजीवदर्शी पुतळ्याचे सर्वांनी दर्शनही घेतले.

या प्रेरणादायी कार्यक्रमात अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. त्यात समितीचे उपाध्यक्ष अरविंद देशमुख, कैलास आप्पा सोनवणे, डीवायएसपी संदीप गावित, सचिव प्रमोद बळीराम पाटील, विष्णू  भंगाळे, दीपक सूर्यवंशी, गनी मेमन, इंजी. विनोद पाटील,पुरुषोत्तम आबा चौधरी, विनोद देशमुख, पत्रकार दिलीप तिवारी, अनंत (बंटी) जोशी, जमील देशपांडे, मुकुंद सपकाळे, प्रफुल्ल पाटील, दिलीप सपकाळे, राजेंद्र देशमुख , सुरेंद्र पाटील, अजयकुमार पाटील, योगेश पाटील, राहुल पाटील, आकाश हिवाळे, शुभम अहिरे, अनिल नन्नवरे व इतर मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन व समारोप
संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध, उत्साही आणि प्रेरणादायी स्वरूपात पार पडला. यशस्वीतेसाठी सचिव प्रमोद बळीराम पाटील, योगेश पाटील, शुभम अहिरे, अनिल नन्नवरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रमपूर्वक संयोजन केले. कार्यक्रमानंतर सर्व मान्यवर व शिवप्रेमींनी एकत्र येऊन महाराजांच्या कार्याचा गौरव करत भविष्यातील स्मारकाच्या उभारणीसाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला. हा कार्यक्रम केवळ एक उत्सव नव्हता, तर तो होता शिवसंस्कृती, राष्ट्रभक्ती आणि इतिहास जागवण्याचे प्रेरणादायी संदेश देणारे पर्व. स्मारक उभारणीच्या वचनामुळे या वर्षीच्या जयंती उत्सवाला एक वेगळेच ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

Share post
Tags: #social news#सार्वजनिक छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव
Previous Post

सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलच्या मानसी वायकोळेचे दहावी परीक्षेत घवघवीत यश

Next Post

अमळनेर रेल्वे स्थानकावर मालगाडीचे डब्बे घसरले, खासदार स्मिताताई वाघ यांनी केली घटना स्थळी पाहणी

Next Post
अमळनेर रेल्वे स्थानकावर मालगाडीचे डब्बे घसरले, खासदार स्मिताताई वाघ यांनी केली घटना स्थळी पाहणी

अमळनेर रेल्वे स्थानकावर मालगाडीचे डब्बे घसरले, खासदार स्मिताताई वाघ यांनी केली घटना स्थळी पाहणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group