अमळनेर – भुसावळ कडून नंदुरबार कडे जाणारी रेल्वे मार्गावरील मालगाडी रुळावरून घसरल्याची घटना आज दि. १५ रोजी प्रताप महाविद्यालयाजवळ दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नसून रेल्वेचे लोको पायलट आणि गार्ड सुरक्षित असून डब्बे खाली पडल्याने आजूबाजूचे ट्रॅक देखील खराब झाल्याने सुरत भुसावळ मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली असून याविषयी माहिती मिळताच खासदार मा. स्मिताताई वाघ यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा करून दुर्घटनेची सविस्तर माहिती घेतली तसेच मदत व पुनर्बांधणी कार्याची पाहणी केली.
या घटनेमुळे काही गाड्यांचे वेळापत्रक प्रभावित झाले असून, रेल्वे प्रशासनाने परिस्थिती लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू केले आहे.
खासदार स्मिताताईंनी प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना तत्काळ राबवाव्यात अशी सूचना रेल्वे प्रशासनाला केली आहे. अपघातग्रस्त पट्ट्यावर रेल्वे सेवा सुरळीत करण्यासाठी काही काळ लागणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे


