जलगांव – भारतीय हवामान विभाग ( IMD ) मुंबईने दुपारी 4 वाजता दिलेला तातडीचा इशारा – पुढील ३–४ तासांसाठी
गंभीर इशारा (४०-५० किमी/ता वाऱ्यासह): – पुणे, सातारा, अहमदनगर, रायगड, नाशिक व छत्रपती संभाजीनगर
मध्यम इशारा (३०-४० किमी/ता वाऱ्यासह): – जळगाव, जालना, बीड, सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग व धाराशिव
सर्व नागरिकांनी पुढील काळजी घ्यावी:
- जनावरे व प्राणी यांची सुरक्षितता.
- जनावरे झाडाखाली बांधू नयेत.
विजेच्या धक्यापासून बचावासाठी त्यांना मेटल शेडखाली ठेवू नये, विशेषतः जे अर्थिंग शिवाय आहेत.
त्यांच्या अन्नपाण्याची सोय करून त्यांना कोरड्या व सुरक्षित ठिकाणी ठेवा.
विजांचा कडकडाट असताना सुरक्षित वागणूक
- विजांचा धोका असताना मोबाइल वापरत चालू नका.
दुचाकीवरून प्रवास टाळा. पावसात व वादळात अपघात होण्याची शक्यता जास्त असते. - जुनी व अपूर्ण इमारतींपासून दूर रहा.
- मोडकळीस आलेल्या किंवा बांधकाम सुरू असलेल्या इमारतीपासून सुरक्षित अंतर ठेवा. पडझड होण्याची शक्यता असते.
- आपली सुरक्षितता आपल्या हाती आहे. कृपया खबरदारी घ्या आणि इतरांनाही सतर्क करा


