जळगाव – युनिक उर्दू हायस्कूल तांबापुर शाळेचा इयत्ता दहावीचा निकाल ९०.३८% लागला असून प्रथम शिफा बी लतीफ खान ८३.००% , द्वितीय जोया बी अब्दुल मोहित शेख ८१.६०% तृतीय अल्फिया बानो शेख अब्बास कुरेशी ८१.२०, चौथ्या क्रमांकावर सुहाना आरिफ काकर ७७.८०%, पाचव्या क्रमांकावर महेविश फातिमा मोहम्मद नदीम ७६.२० टक्के मिळून यशस्वी झालेले आहे.
संस्थेचे सचिव अ.कय्युम शाह , इकरा शाळेचे माजी प्राचार्य शेख गुलाब , साबिर शाह शेठ शाळेचे मुख्याध्यापक शेख नईम व वर्ग शिक्षिका रिजवाना खाटीक यांनी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देवून त्यांचे सत्कार करून उज्वल भविष्य साठी शुभेच्छा दिले.


