Thursday, December 4, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

खरीप हंगाम २०२५ नियोजनासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय १६ मे रोजी आढावा बैठक

by Divya Jalgaon Team
May 15, 2025
in कृषी विषयी, जळगाव
0
खरीप हंगाम २०२५ नियोजनासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय १६ मे रोजी आढावा बैठक

जळगाव – जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२५ च्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय आढावा बैठक दिनांक १६ मे २०२५ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, जळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीत गुणवत्तापूर्ण बियाणे, खते, कीटकनाशके यासह शेतकऱ्यांना आवश्यक निविष्ठा उपलब्धतेबाबत, कृषी विभाग आणि संलग्न विभागाच्या विविध योजना, मोहिमा, तंत्रज्ञान आणि आगामी हंगामासाठीचे नियोजन यांचा सविस्तर आढावा घेण्यात येणार आहे. बैठकीस जिल्ह्यातील सर्व संबंधित लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

खरीप हंगाम नियोजनाच्या बैठकीत पुढील विषयांचा समावेश करण्यात येणार आहे: मागील वर्षीच्या खरीप बैठकीतील मुद्यांचा अनुपालन अहवाल, जिल्ह्याची सर्वसाधारण कृषि माहिती, मागील वर्षाचा क्षेत्र, उत्पादन आणि उत्पादकता अहवाल, यावर्षासाठीचे लक्षांक, पर्जन्यमान स्थिती, नैसर्गिक आपत्ती व आपत्कालीन पिक नियोजन, विशेष उपक्रम, निविष्ठांची आवश्यकता व गुणवत्ता नियंत्रण, केंद्र व राज्य पुरस्कृत योजना, पिक विविधीकरण, पिक विमा योजना, अपघात सुरक्षा योजना, किसान सन्मान निधी योजना, फलोत्पादन क्षेत्र व उत्पादकता वाढ, स्मार्ट प्रकल्प, संजीवनी प्रकल्प (पोकरा), कृषी पंपासाठी वीज जोडणी, पतपुरवठा, पाणीपुरवठा आणि संलग्न विभागांच्या योजना.

सदर बैठकीसंदर्भातील सर्व आवश्यक तयारी करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कुर्बान तडवी यांनी दिली आहे.

Share post
Tags: #District Superintendent Agriculture Officer Qurban Tadvi#पालकमंत्री गुलाबराव पाटीलshetkari news
Previous Post

युनिक उर्दू हायस्कूल मध्ये इयत्ता दहावी चे विद्यार्थ्यांचे यश

Next Post

सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलच्या मानसी वायकोळेचे दहावी परीक्षेत घवघवीत यश

Next Post
सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलच्या मानसी वायकोळेचे दहावी परीक्षेत घवघवीत यश

सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलच्या मानसी वायकोळेचे दहावी परीक्षेत घवघवीत यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group