अमळनेर – नेहमी नाविण्यपूर्ण सामाजिक उपक्रम राबवून समाजकार्यात वेगळी ओळख निर्माण करणारे मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष तथा व्हॉईस ऑफ मीडियाचे प्रदेश सरचिटणीस डॉ डिगंबर महाले यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
मंगळग्रह सेवा संस्थेच्या माध्यमातून डॉ. डिगंबर महाले यांनी धार्मिकताच नव्हे तर सामाजिक क्षेत्रात नाविण्यपूर्ण सामजिक उपक्रम राबवून एक आगळावेगळा ठसा उमटविला आहे. त्यांच्या याच सामाजिक कार्यातून प्रेरित होऊन अमळनेर येथील व्हॉईस ऑफ मीडियाच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ. डिगंबर महाले यांच्या वाढदिवशी पिंपळे रोडवरील आदिवासी समाज वस्तीतील शेकडो लहान बालकांना थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून कानटोपींचे वाटप केले. तसेच गलवाडे रोडवरील ममता विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांना जिलेबीसह मिष्टांन्न दिले. यावेळी विद्यालयाचे शिक्षकवृद उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा संघटक जयेशकुमार काटे, तालुकाध्यक्ष उमेश काटे, उपाध्यक्ष गौतम बिऱ्हाडे, सचिव जितेंद्र पाटील, कोषाध्यक्ष रवींद्र मोरे, साप्ताहिक विंग, तालुकाध्यक्ष अजय भामरे, सल्लागार उमेश धनराळे, सदस्य जयंतीलाल वानखेडे, भाऊसाहेब देशमुख, विनोद कदम, राहुल बहिरम, चंद्रकांत पाटील, शरद कुलकर्णी, दिनेश पालवे, मधुसूदन विसावे, ईश्वर महाजन, रजनीकांत पाटील, संजय पाटील, दयाराम पाटील, प्रसाद जोशी, किरण चव्हाण, निरंजन पेंढारे, पंकज पाटील, रमण भदाणे, बापूराव ठाकरे, उमाकांत ठाकूर, जगदीश पाटील, भूषण महाले आदींचे सहकार्य लाभले.