जळगाव – जळगाव शहरातील प्रतिथयश विधीज्ञ ॲड. संजय मनोहर राणे यांची माध्यम समूह ‘लोकमत’तर्फे “लोकमत ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड” करीता निवड करण्यात आली आहे. त्यांना उद्या दि. ५ डिसेंबर रोजी अझरबैजान देशात एका भव्य सोहळ्यामध्ये पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
गेल्या अनेक वर्षापासून ॲड. संजय राणे हे वकिली व्यवसायामध्ये कार्यरत आहेत. भोरगाव लेवा पंचायतमध्येदेखील त्यांनी सचिव पदावर असताना अनेक स्तुत्य असे उपक्रम राबविले आहेत. तर विविध सामाजिक संघटनांमध्ये कार्यरत राहून ॲड. संजय राणे यांनी विविध सामाजिक उपक्रम घेतले आहेत.
त्यांच्या स्तुत्य कार्याची दखल घेऊन माध्यम समूह ‘दैनिक लोकमत’ तर्फे अझरबैजान देशातील बाकू शहरात विविध मान्यवरांसह ॲड. संजय राणे यांना गौरविण्यात येणार आहे. गुरुवार दि. ५ डिसेंबर रोजी एका शानदार अशा सोहळ्यामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव करण्यात येणार आहे.