Thursday, December 4, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे महात्मा गांधी उद्यानात ‘पाडवा पहाट’ चे आयोजन

by Divya Jalgaon Team
October 27, 2024
in जळगाव, सामाजिक
0
स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे महात्मा गांधी उद्यानात ‘पाडवा पहाट’ चे आयोजन

जळगाव  – भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २ नोव्हेंबर रोजी, पहाटे ६ वाजता, महात्मा गांधी उद्यान येथे दिपावली निमित्त पाडवा पहाट चे आयोजन करण्यात आले आहे. या वर्षीचे सुरमणी पं. धनंजय जोशी सादर करतील. त्यांना तबल्याची संगत कार्तिकस्वामी तर मिहिर जोशी संवादीनीची साथ करणार आहेत. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती मेजर नानासाहेब वाणी, अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ. निशा जैन, राजेंद्र कुलकर्णी असतील.

दिवाळी हा सण अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा, आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय दर्शवतो. अंधकार दूर करून प्रकाश निर्माण करणारा दीप हा मांगल्याचे प्रतीक मानले जाते, त्याच प्रकाशाने आपल्या जीवनातील अंध:कार दूर व्हावा, म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो. पावसाळ्यानंतर बळीराजाला मिळालेल्या समृद्धीचा आनंद उत्सवाचा कृतज्ञतेचा सोहळा म्हणजेच दिवाळी. दीपोत्सवाच्या निमित्ताने स्वरोत्सव साजरा करण्याची प्रतिष्ठांची २२ वर्षांची परंपरा आणि यंदाचे हे २३ वे वर्ष. प्रसन्न झुंजू मुंजू पहाट, पूर्वेकडे सूर्यनारायणाची चाहूल, कलात्मक रांगोळ्या, निशिगंधाच्या फुलांचा मंद सुगंध, आणि सुरेल सुरांच्या आरोह अवरोहाची आंदोलने. हे सर्व अनुभवण्यासाठीच यायला हवं “पाडवा पहाट” मैफिलीला. या कार्यक्रमास दरवर्षी प्रमाणे भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन, कै. नथ्थू शेट चांदसरकर चॅरिटेबल ट्रस्ट, श्री प्लायवूड सेंटर या संस्थांनी सहकार्य केलेले आहे. चुकवू नये अश्या या प्रात:कालीन मैफिलीला तमाम जळगावकर रसिकांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आलेले आहे.

Share post
Tags: #Bhawarlal and Kantabai Jain Foundation#vasantrao chandorkar smruti pratishthan#पाडवा पहाटभवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशन
Previous Post

नाशिक विभागीय तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचे वर्चस्व

Next Post

‘अनुभूती बालनिकेतन’द्वारे संस्कारशील समाज घडविण्याची प्रेरणा – सेवादास दलिचंद ओसवाल 

Next Post
‘अनुभूती बालनिकेतन’द्वारे संस्कारशील समाज घडविण्याची प्रेरणा – सेवादास दलिचंद ओसवाल 

‘अनुभूती बालनिकेतन’द्वारे संस्कारशील समाज घडविण्याची प्रेरणा - सेवादास दलिचंद ओसवाल 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group