जळगाव – क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, यांच्या संयुक्त विद्यमाने २४ ते २५ ऑक्टोबर दरम्यान सिन्नर येथे नाशिक विभागीय तायक्वांडो स्पर्धा घेण्यात आल्यात. या स्पर्धेत जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनच्या खेळाडूंनी आपला दबदबा कायम ठेवत १४, १७, १९, वर्षे मुलं व मुली यांच्या विविध वजनी गटात ३४ सुवर्णपदके पटकावली. यशस्वी खेळाडूंची पुणे येथे होत असलेल्या शालेय राज्य तायक्वांडो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
निवड झालेले खेळाडू पुढीलप्रमाणे : १४ वर्षातील मुले १८ किलो आतील भुषण जितेंद्र कोळी ( एस. व्ही. पटेल स्कूल, ऐनपुर), २९ ते ३२ किलो भावेश अण्णासाहेब निकम (सावित्रीबाई फुले स्कूल पहुर), ३२ ते ३५ किलो दक्ष शाम तायडे ( सरदार जी जी हायस्कूल रावेर), ३८ ते ४१ किलो मयुर राम पाटील ( प्रोग्रेसिव्ह इंग्लिश, जळगाव),
१४ वर्षे आतील मुली : १८ ते २० किलो निधी गोपाळ कोळी (एस व्ही पटेल, ऐनपुर), २० ते २२ किलो स्नेहा विठ्ठल वाघ (एस व्ही पटेल ऐनपुर), २४ ते २६ मोहीनी हरिभाऊ राऊत (सावित्रीबाई फुले स्कूल, पहुर), २६ ते २९ किलो अंकिता सुनील उबाळे (सरस्वती प्राथमिक मंदीर, शेंदूर्णी), २९ ते ३२ किलो खुशी विनोद बारी (स्वामी इंग्लिश स्कूल रावेर), साची उदय पाटील (अनुभूती इंटरनॅशनल निवासी स्कूल शिरसोली)
१७ वर्षे आतील मुलं : ३५ किलो आतील सोहम गिरधर कोल्हे (ऐन. एच. राका हायस्कूल, बोदवड), ३५ ते ३८ किलो सतिश सुनिल क्षिरसागर (इंदिराबाई ललवाणी महाविद्यालय, जामनेर), ४८ ते ५१ किलो अमर अशोक शिवलकर (यशवंत विद्यालय), ५१ ते ५५ किलो अनिरुद्ध सुनिल महाजन (सरदार जी जी हायस्कूल रावेर), ५५ ते ५९ किलो वेदांत अनिल क्षिरसागर (इंदिराबाई ललवाणी महाविद्यालय जामनेर), ६८ ते ७३ किलो क्षितीज नंदकिशोर बोरसे (कै. पि. के. शिंदे पाचोरा ), ७८ किलो वरील देवेश गजानन सोनवणे (सावित्रीबाई फुले स्कूल पहुर)
विजयी खेळाडूंना जयेश बाविस्कर, जयेश कासार, हरिभाऊ राऊत, भुषण मगरे, सुनिल मोरे, स्नेहल अट्रावलकर, पुष्पक महाजन यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. तर जिवन महाजन, यश शिंदे यांनी पंच म्हणून काम पाहिले. सर्व यशस्वी खेळाडूंना संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष ललीत पाटील, महासचिव अजित घारगे, कोषाध्यक्ष सुरेश खैरनार, सहसचिव रविंद्र धर्माधिकारी, सदस्य महेश घारगे, नरेंद्र महाजन, कृष्णकुमार तायडे, सौरभ चौबे यांनी कौतूक केले.