जळगाव – क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा कार्यालय नाशिक आणि जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सिन्नर येथे नाशिक विभागस्तरीय शालेय तायक्वांडो स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये अनुभूती निवासी स्कूलची इयत्ता ८ वीची विद्यार्थीनी साची पाटील हिने १४ वर्ष वयोगटा खालील मुलींच्या ३२ ते ३५ वजनगटात भाग घेतला. यामध्ये तीन फेरांमध्ये प्रतिस्पर्धकांनी साची पाटील हिने एकतर्फे मात दिली. जळगाव मनपा ३२-१०, नाशिक मनपा २६-२०, नाशिक ग्रामीण २४-२० ह्यांच्यावर तिने विजय मिळविला. या विजयामुळे तिला सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले. तिची निवड पुणे बालेवाडी येथे दि.२८ ते ३१ ऑक्टोबर ला होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिला प्रशिक्षक जयेश बाविस्कर (एनआयएस) यांनी मार्गदर्शन केले.
तिच्या यशाबद्दल अनुभूती निवासी स्कूलच्या संचालिका सौ. निशा जैन, प्राचार्य देबासिस दास, जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष ललीत पाटील, कोषाध्यक्ष सुरेश खैरनार, महासचिव अजित घारगे, सहसचिव रविंद्र धर्माधिकारी, सदस्य महेश घारगे, नरेंद्र महाजन, कृष्णकुमार तायडे, सौरभ चौबे तसेच जैन स्पोर्टस् अकॅडमीचे अरविंद देशपांडे यांनी कौतुक केले आहे.