जळगाव – इनर व्हिल क्लब ऑफ जळगाव जिल्हा ३०३ चा शुक्रवार सकाळी ११.०० वाजता हॉटेल नैवेद्य, काव्यरत्नावली चौक, जळगाव येथे पदग्रहण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या वेळी अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ. निशा अनिल जैन प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. क्लबच्या अध्यक्षपदी सौ. उषा जैन यांची तर सचिवपदी निशिता रंगलानी यांची वर्ष २०२४-२५ करिता निवड करण्यात आली आहे. उर्वरित कार्यकारिणीची सोहळ्यात घोषणा करण्यात येणार आहे.
आयोजित पदग्रहण कार्यक्रमात अध्यक्ष व सचिव यांच्यासह नूतन कार्यकारिणी पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत, असे मावळते अध्यक्ष डॉ. रितु कोगटा व सेक्रेटरी डॉ. मयुरी पवार यांनी कळवले आहे.