जळगाव – ‘संख्यात्मकदृष्ट्या विचार न करता गुणवत्तापूर्ण उपक्रमावर भर देणार असून इनर व्हिल क्लबच्या अध्यक्षपदामुळे जबाबदारी वाढली आहे. आज पहिल्याच दिवशी सायकल वाटप, आर्थिकदृष्ट्या आवश्यकता असणाऱ्या विद्यार्थ्यासाठी शैक्षणिक मदत करण्याची घोषणा त्यांनी केली.
इनर व्हिल क्लब ऑफ जळगाव जिल्हा ३०३ चा आज (ता.५) ला हॉटेल नैवेद्य येथे पदग्रहण सोहळा सौ. निशा जैन यांच्या प्रमूख उपस्थितीत झाला. यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर इनर व्हिल क्लबच्या मावळत्या अध्यक्ष डॉ. रितु कोगटा, सचिव डॉ. मयूरी पवार, नवनियुक्त अध्यक्ष सौ. उषा जैन, सचिव निशिता रंगलानी उपस्थित होत्या. मान्यवर उपस्थितांसह माजी अध्यक्ष नुतन कक्कड, संगिता घोडगावकर, मिनिल लाठी यांच्याहस्ते दीपप्रज्वलन झाले. उषा जैन अध्यक्ष पदासाठी तर सचिवपदासाठी निशिता रंगलानी यांना बॅज पिनिंग पदाधिकारींच्या उपस्थित झाले.
२०२४-२०२५ करिता निवड झालेल्या कार्यकारिणीची घोषणा सौ. उषा जैन यांनी केली. कोषाध्यक्ष गुंजन कांकरिया, आयएसओ रूचि चांदिवाल, सीसी रंजन शहा, सीसीसी डॉ. शितल अग्रवाल, कार्यकारिणी सदस्य दिप्ती अग्रवाल, साधना गांधी, ज्योत्स्ना रायसोनी, संध्या महाजन, शैला कोचर, सल्लागार नुतन कक्कड, निता जैन यांची निवड करण्यात आली. निशा जैन यांच्यासह अध्यक्ष, सचिवांच्या कुटुंबाचा सत्कार करण्यात आला. डॉ. मयूरी पवार यांनी आभार मानले. दिप्ती अग्रवाल, निकिता मयूर अग्रवाल यांनी सूत्रसंचालन केले.. डॉ. रितु कोगटा यांनी मागील दोन वर्षात इनर व्हील क्लब ने केलेल्या कार्याचा आढावा घेत नविन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्यात. डॉ. मयुरी पवार, निशिता रंगलानी यांनीही मनोगत व्यक्त केले. इनर व्हिल क्लबचा लोगो आलेल्या पदाधिकारी व पाहुण्यांच्या वाहनांवर लावण्यात आला.