जळगाव (प्रतिनिधी) – धरणगाव येथे शेतात नेतांना काही शेत मजूर महिलांचा अपघात झाला होता. घटनेची माहिती मिळताच माजी जि.प. सदस्य प्रतापराव पाटील यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेत डॉक्टरांना तात्काळ उपचारासंबंधी सूचना दिल्यात.
धरणगावातील कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ शेतमजूर महिलांना शेतात नेणाऱ्या वाहनाला अपघात झाल्याची घटना आज सकाळी घडली होती. या अपघातात १ महिला जागीच ठार तर ७ महिला आणि चालक जखमी झाल्या होत्या. जखमींना जळगाव वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. घटनेची माहिती मिळताच माजी जि.प. सदस्य प्रतापराव पाटील यांनी रुग्णालयात धाव घेतली. तसेच जखमींची विचारपूस करत त्यांना धीर दिला. यावेळी डीन डॉ. गिरीश ठाकूर हे उपस्थित होते. सदस्य प्रतापराव पाटील यांनी डॉक्टरांना जखमींवर तात्काळ उपचार करण्याच्या सूचना दिल्यात.