Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आयोजित सांज पाडवा एक मंत्रमुग्ध करणारा अनुभव

by Divya Jalgaon Team
April 12, 2024
in जळगाव, सामाजिक
0
स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आयोजित सांज पाडवा एक मंत्रमुग्ध करणारा अनुभव

जळगाव  – चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात “गुढीपाडवा”. मराठी नवीन वर्षाचा आरंभ. साडेतीन मुहूर्तांपैकी एक संपूर्ण मुहूर्त. गुढीपाडवा म्हणजे वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल. या ऋतूचा आणि उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनच्या सहकार्याने स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे “सांज पाडवा” या सांगितिक मैफिलीचे आयोजनाने भाऊंच्या उद्यानात संपन्न झाला. जळगावच्या गुणी कलावंतांनी हा कार्यक्रम सादर केला.

या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व उद्घाटन म्हणून विकास तळेले (डेप्युटी रजिस्टर, कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ) तसेच डॉ. मधुलिका सोनवणे (डायरेक्टर, विशारद स्किल डेव्हलपमेंट सेंटर, कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ) उपस्थित होते. गुरुवंदना दीपक चांदोरकर यांनी सादर केली. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत अध्यक्ष डॉ. विवेकानंद कुलकर्णी व उपाध्यक्षा दीपिका चांदोरकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नुपूर खटावकर यांनी केले. नववर्षाच्या स्वागतच सुरेल प्रवासाच्या या कार्यक्रमात श्रुती जोशी, ऐश्वर्या परदेशी, वरूण नेवे, अथर्व मुंडले तर साथसंगत केली प्रसन्न भुरे (तबला) राजेंद्र माने (संवादिनी) शुभम कुलकर्णी (मंजिरी) आणि निरूपण केले होते अनघा गोडबोले हे कलावंत सहभागी होते. कलावंतांचे सत्कार डॉ. विवेकानंद कुलकर्णी, अरविंद देशपांडे, दीपिका चांदोरकर यांनी केले.

सांज पाडव्यात ही गाणी सादर झाली
तराणा आदीदेव महादेव राग यमन याने सुरवात झाली. यानंतर अनंता तुला कोण पाहू शके, त्या फुलांच्या गंधकोशी, पांडुरंग कांती, पांडुरंग नामी लागलासे ध्यास, रुणुझुणू रुणुझुणू, तू सुखकर्ता, श्री राम चंद्र कृपाळू, हे सुरांनो चंद्र व्हा, नारायणा रमा रमणा, विश्वाचा विश्राम रे, मन मंदिरा, दिल की तापीश, मी राधिका, बाजे मुरलीया,भैरवी अवघा रंग एक झाला यानंतर धन्य भाग सेवा का याने उत्तरोत्तर रंगलेल्या सांज पाडवा मैफिलीचा समारोप झाला.

Share post
Tags: #Gudhipadva#स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठानभवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशन
Previous Post

पक्षाध्यक्ष शरदचंद्र पवारांनी स्वतः खुलासा केल्यावर डॉक्टर सतीश पाटील तोंडघशी पडल्याचे उघड

Next Post

अवकाळी पावसाने बोदवड तालुक्यात झालेल्या नुकसानीची रोहिणी खडसे यांनी केली पाहणी

Next Post
अवकाळी पावसाने बोदवड तालुक्यात झालेल्या नुकसानीची रोहिणी खडसे यांनी केली पाहणी

अवकाळी पावसाने बोदवड तालुक्यात झालेल्या नुकसानीची रोहिणी खडसे यांनी केली पाहणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group