जळगाव – राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांची एक मुलाखत सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे यांच्या बाबतीत आग ओकतांना दिसत आहे. खडसेंना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊच नका त्यांच्या प्रवेशाने पक्षाला काही फरक पडणार नाही, यासंदर्भात त्यावेळी अर्धा तास पवार साहेबांशी चर्चा केली तरी त्यांना प्रवेश दिला मात्र आता,” खडसेंना प्रवेश देणे ही माझी चूक होती ” अशी कबुली खुद्द शरद पवार साहेबांनी दिली असा दावा डॉ. पाटील करत आहे,मात्र काल स्वतः शरद पवार साहेबांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले की, ” सत्ताधाऱ्यांकडून एकनाथराव खडसेंच्या बाबतीत अत्यंत टोकाची भूमिका घेण्यात घेण्यात आली आहे विविध चौकशीच्या ससेमिऱ्याने ते हतबल झाले आहेत. त्यांच्या व्यक्तिगत प्रॉपर्टीवर सुद्धा प्रचंड बंधने आणली आहेत. यातून सोडवणूक करायची आवश्यकता होती याबाबत खडसेंनी माझ्याशी चर्चा केली तेव्हा आम्ही सांगितले तुम्ही गेलात तरी तुम्हाला कोणताही दोष आम्ही लावणार नाही कोणताही गैरसमज करून घेणार नाही. ” एकंदरीत आ. खडसेंच्या होऊ घातलेल्या भाजपा प्रवेशाला केंद्रीय समितीकडून मिळालेला ग्रीन सिग्नल काहींच्या पचनी पडलेला नाही. त्यामुळे प्रवेशाआधीच खडसे नावाचा धसका स्वपक्षीयांसह काही विरोधकांनी घेतल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
नेमके काय म्हणाले शरद पवार?
‘‘आम्ही काही गैरसमज करून घेणार नाही सत्ताधाऱ्यांनी एकनाथ खडसेंच्या अनेक चौकशी सुरू केल्या असून त्यांच्या व्यक्तिगत प्रॉपर्टीवर सुद्धा प्रचंड बंधने आणली आहेत त्यांच्याबद्दल अत्यंत टोकाची भूमिका घेतली आहे त्यामुळे ते हतबल झाले आहेत यातून सोडवणूक करण्याची आवश्यकता होती याबाबत त्यांनी आमच्या जवळ चर्चा केली आम्ही सांगितलं जिथून तुम्हाला रिलीफ मिळेल तिथे तुम्ही गेलात तर आम्ही तुम्हाला काही दोष लावणार नाही किंवा काही गैरसमज करून घेणार नाही’’


