Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जिल्हास्तरीय वारकरी भवनाचे’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

पंचावन्न एकरवर उभे राहणार भव्य ' वारकरी भवन

by Divya Jalgaon Team
March 4, 2024
in जळगाव, सामाजिक
0
जिल्हास्तरीय वारकरी भवनाचे’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

जळगाव – जळगाव सारख्या संताच्या भूमीत वारकरी भवन होत आहे. अशा या जिल्हास्तरीय वारकरी भवनला निधीची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जळगाकरांना दिली.
आज त्यांच्या हस्ते या ‘वारकरी भवन’ चे भूमिपूजन खेडी ( जळगाव )येथे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

या भूमिपूजन सोहळ्यास ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीष महाजन,राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील,
मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, खा. उन्मेष पाटील, खा रक्षा खडसे, आ. राजुमामा भोळे, आ किशोरआप्पा पाटील, आ.चिमणराव पाटील, आ.चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, भ.प.गजानन महाराज वरसाडेकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की,आज आपल्याला इथे आल्यावर वारकरी संप्रदाय भेटला आणि मनाला खुप आनंद झाला. आज उत्तर महाराष्ट्रामध्ये पहिल्या ‘वारकरी भवन’ चे भूमीपूजन होत आहे. या कामी ज्यांचे ज्यांचे हात लागले त्यांचे आभार आणि ज्यांचे लागणार आहेत सर्वांना या निमित्ताने मी मनापासून शुभेच्छा देतो.

पालकमंत्री श्री. गुलाबराव पाटील यांनी विकासकामा सोबत अनेक प्रकल्प जिल्ह्यात आणले आहेत परंतू या सर्वात महत्वाचे असे ‘वारकरी भवन’ बांधण्याचा त्यांचा निर्णय अंत्यत चांगला असल्याचे सांगून या ‘वारकरी भवन’ प्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात वारकरी भवन बांधावे असे त्यांनी यावेळी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, आपल्या राज्यात वारकरी संप्रदाय खुप मोठा आहे. तो गावोगावी अंखड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून, त्यातील किर्तनाच्या माध्यमातून अतिशय दुर्गम भागात देखील पांडुरंगाचे नामस्मंरण करुन मोठया प्रमाणात समाज प्रबोधनच काम तसेच जनजागृतीच काम करीत आहे.

पंढरपुरचा विकास होत असतांना राज्यातील जेवढी म्हणून तीर्थक्षेत्र आहेत, त्या सर्व तीर्थक्षेत्राचा विकास करण्याचे आमच्या सरकाने ठरविले आहे. विशेष म्हणजे राज्यातील ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात मध्ये अडीच हजार कोटींची तरतुद केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. प्रारंभी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वारकरी भवनाचे भूमीपूजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी मोठया प्रमाणात वारकरी आणि नागरिक उपस्थित होते.

असे आहे वारकरी भवन
प्रस्तावित जिल्हातील वारकरी भवन ५५ एकरांच्या भूखंडावर होणार असून त्याला सहा कोटी सहा लाख एवढा निधी अपेक्षित आहे. इथले वारकरी भवन इतर जिल्ह्यांसाठी मार्गदर्शक प्रकल्प ठरणार आहे. या वारकरी भवनास जिल्हा वा‍र्षिंक योजनेच्या नाविण्यपूर्ण योजनेतून 6 कोटी 6 लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला आहे. एकूण बांधकाम- १८१०.३८ चौ.मी. (तळ मजला) (टप्पा-1) वारकरी भवन पहिल्या टप्प्यात सभामंडप व भक्त निवास इमारत (मुख्य इमारत ) प्रस्तावित आहे.

Share post
Tags: #eknathrao shinde#jalgaon khedi#Warkari Bhawan'#वारकरी भवनGirish MahajanGulabrao Patil
Previous Post

भक्ती संगीत संध्येतून भवरलाल जैन यांच्या गुणसंपदेचे प्रेरणादायी स्मरण

Next Post

भरधाव डंपरने बालकाला चिरडले ; आसोदा रस्त्यावरील घटना

Next Post
भरधाव डंपरने बालकाला चिरडले ; आसोदा रस्त्यावरील घटना

भरधाव डंपरने बालकाला चिरडले ; आसोदा रस्त्यावरील घटना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group