Friday, December 5, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

परिवर्तनने जळगावचा सांस्कृतिक पाया समृद्ध केला

मान्यवरांचा सुर; सहा दिवसांच्या मैत्र महोत्सवाचा प्रारंभ

by Divya Jalgaon Team
February 25, 2024
in जळगाव, सामाजिक
0
परिवर्तनने जळगावचा सांस्कृतिक पाया समृद्ध केला

जळगाव – भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या सहकार्यातून संजीवनी फाऊंडेशन व परिवर्तन संस्थेतर्फे आयोजीत मैत्र महोत्सवाचा आज भाऊंचे उद्यानात एम्पी थेटअरमध्ये ‘बाजे रे मुरलिया’ या बासरी वादनाच्या कार्यक्रमाने प्रारंभ झाला. आजपासून 29 फेब्रुवारी पर्यंत दररोज सायंकाळी 6.30 वाजैला मैत्र महोत्सव असेल.

कलश हस्तांतरित करून महोत्सवाचे अनोखे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन आणि आरती हुजूरबाजार उपस्थित होते. भावांजली महोत्सवाचे प्रमुख अनिल शहा, अनिल कांकरिया, अमर कुकरेजा, छबीराज राणे, होरीलसिंग राजपूत, सोनाली पाटील, नारायण बाविस्कर, सुदिप्त सरकार यांच्या हस्ते कलश ‘मैत्र महोत्सवाच्या प्रमुखांकडे हस्तांतरित केले. त्यात डाॕ. रेखा महाजन यांच्यासह नंदूशेठ अडवाणी, इंजि. प्रकाश पाटील, स्वरूप लूंकड, शैलेश कोलते , विनोद पाटील, मानसी गगडाणी, पारस राका हे मैत्री महोत्सवाचे प्रमुख आहेत.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर रेखा महाजन यांनी केले. जळगाव शहराचे सामाजिक स्वास्थ,सांस्कृतिक पाया भक्कम करण्यासह स्थानिक कलावंतांना व्यासपिठ उपलब्ध करून देण्याचे काम परिवर्तन करते. कला आणि साहित्यावर निस्सम प्रेम करणारे जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलाल जैन यांच्या प्रेरणेतून ही संस्था फुलली. कलेच्या माध्यमातून जळगाव शहर सुंदर व्हावं हे मोठेभाऊंना वाटायचे ह्याच संस्कारातून अशोकभाऊ सह संपूर्ण जैन परिवार कलावंताच्या पाठिशी उभे असतात असे मनोगत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. मैत्र महोत्सव या संकल्पनेची प्रेरणा ही अशोक जैन यांच्याकडून आल्याचे सांगत हर्षल पाटील यांनी मैत्र ही संकल्पना सविस्तर उलगडली. मैत्री च्या पुढे जावून जे ऋणाबंध जुळवून येतात ते म्हणजे मैत्र हे मैत्र भवरलाल जैन व ना. धों. महानोर यांच्यात होते. त्यांच्या कार्यातून या सृष्टीच्या सभोवताली आहे असल्याचे ते म्हणाले.

वैष्णव जन तो हे ने बाजे मुरलियाची सूरवात झाली. धानी रागातील धून गोरी तेरा गा त्यानंतर यमन रागावरील गीते त्यात बाजे मुरलिया ने रसिकांना वेगळी अनुभूती मिळाली.मिश्र शिवरंजनी, हिरो यानंतर पहाडी धुनने कार्यक्रमाची सांगता झाली. बाजे रे मुरलिया या कार्यक्रमाची निर्मिती परिवर्तन संस्थेची असून दिग्दर्शन ज्येष्ठ बासरी वादक संजय सोनवणे यांनी केले आहे. आज सादर झालेल्या कार्यक्रमात वीस बासरी वादकांचा सहभाग होता. यात गणेश पवार, दिनेश बि-हाडे, रविंद्र बारी, पियूष बि-हाडे, यश महाजन, कृष्णा कोलते, हेमंतकुमार चौधरी, राजेश राठोड, सतचित जोशी,, सुमित सोनवणे, कुशलपाल पाटील,मंगेशा सोनवणे, प्रक्षिक सपकाळे, क्रिष्णा कोलते, देवेश काळे, सुरेश दाभाडे,अमोल वाघ, तुषार हिवाडे हे कलावंत बासरी वादनात सहभागी होते. आॕर्गनवर अनिल तायडे,ॲक्टोपॕडवर दिनेश ठाकूर,ढोलक हॕन्डसोनीकवर जय सोनवणे यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे निवेदन मानसी जोशी यांनी केले. महोत्सवात उद्या दि.२५ ला अनुभूती निवासी शाळेच्या विद्यार्थ्यांचा ‘भक्ती संगीत संध्या’ ह्या कार्यक्रम होणार आहे.

Share post
Tags: #बाजे रे मुरलिया#भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाउंडेशन
Previous Post

जितेंद्र अरुणभाई चांगरे यांची अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या युवा प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी निवड

Next Post

महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनच्या निवडणुकीत संजय पवार व रोहित निकम यांची बिनविरोध निवड

Next Post
महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनच्या निवडणुकीत संजय पवार व रोहित निकम यांची बिनविरोध निवड

महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनच्या निवडणुकीत संजय पवार व रोहित निकम यांची बिनविरोध निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group