जळगांव – राष्ट्रवादी कांग्रेस विभाग जळगांव महानगर जिल्हा अध्यक्ष तसेच अखिल भारतीय वाल्मिकी महासभेचे राष्ट्रीय सचिव तसेच कामगार नेते तथा दलितमित्र अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस चे तत्कालीन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कै.अरुणभाई शिवप्रकाशजी चांगरे यांचे सुपुत्र जितेंद्र अरुणभाई चांगरे यांची अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस ७२६२ चे युवा प्रकोष्ठ च्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी निवड करण्यात आलेली आहे.
अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.राजेशजी बैनीवाल साहेब यांनी ही निवड केलेली आहे ह्या निवड बद्दल जितेंद्र अरुणभाई चांगरे यांना राष्ट्रीय प्रमुख महामंत्री मा.श्री. जयप्रकाशजी चांगरे साहेब, संघटनेचे राष्ट्रीय कार्यध्यक्ष श्री आशाताई चावरीया,कोषाध्यक्ष श्री प्रकाशजी चावरिया, राष्ट्रीय संगठन मंत्री श्री सायमन गटु जी, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य पं.श्री जितेंद्र मनीरामजी चांगरे,श्री राजेंद्र जी सोलंकी,श्री राजाजी चव्हाण,राष्ट्रीय उपाध्यक्ष सौ.ज्योतीताई मनीषजी परमार/चांगरे.श्री अमित कुमार चांगरे आदी पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी जितेंद्र अरुणभाई चांगरे यांना अभिनंदन करुन भविष्यातील यशस्वी वाटचालिस शुभेच्छा दिले.