जळगाव – महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ म्हणजेच मार्केटिंग फेडरेशनच्या निवडणुकीत संजय पवार यांची पुन्हा बिनविरोध निवड करण्यात आली असून रोहित निकम यांची देखिल बिनविरोध यावेळी करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनच्या निवडणुकीची आज माघारीचा शेवटचा दिवस होता गेल्या सात ते आठ महिन्यापूर्वी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शासनाने या निवडणुकीला स्थगिती दिली होती स्थगिती उठल्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आणि आज माघारीचा शेवटचा दिवस होता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री नामदार दिलीपराव वळसे पाटील व महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील जळगाव जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल दादा पाटील तसेच जळगाव जिल्ह्याचे तरुण आणि तडफदार आमदार मंगेश दादा चव्हाण आमदार संजय सावकारे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली.
नाशिक विभागातून म्हणजेच जळगाव धुळे नंदुरबार नाशिक अहमदनगर या पाच जिल्ह्यातून जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान चेअरमन संजय पवार तसेच भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष व जळगाव दूध संघाचे संचालक रोहित निकम यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली या निवडणुकीसाठी नासिक येथील अपूर्व दादा हिरे राजेंद्र दादा ढोकळे येवल्याचे शाहू पाटील अहमदनगरचे युवराज तनपुरे श्रीगोंद्याचे दत्ताजी पानसरे व भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते संजय दादा गरुड नंदुरबार येथील संजीव रघुवंशी या मान्यवरांनी वरील नेत्यांच्या विनंतीवरून आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.
त्याबद्दल श्री पवार व निकम यांनी सर्वांचे आभार मानले महिनाभरापूर्वी महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाच्या महाराष्ट्र राज्याच्या जळगाव विभागातून म्हणजेच जळगाव धुळे नाशिक नंदुरबार या विभागातून देखील संजय जी पवार यांची कापूस उत्पादक पणन महासंघात विभागीय अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली होती आणि आज देखील पुन्हा श्री पवार व निकम यांनी जिल्ह्यामध्ये सहकार क्षेत्रात आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे.
संजय पवार हे जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच कापूस उत्पादक पणन महासंघ तसेच महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन या लागोपाठ तीन निवडणुकीमध्ये बिनविरोधची परंपरा त्यांनी राज्यावर देखील कायम ठेवली.