जळगाव –सफाई कामगारांच्या संदर्भात राज्य सरकारशी झालेल्या चर्चेतून प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्याने अखील भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या वतीने आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले असून या उपोषणाला सामाजिक न्याय विभागाचे महानगर जिल्हाध्यक्ष जितेंद्र अरुण भाई चांगरे यांनी या उपोषण स्थळी भेट दिली.
या आंदोलनात जितेंद्र चांगरे, जयप्रकाश चांगरे, आशा चावरिया, प्रकाश चावरिया, सुभाष पवार यांच्यासह आदीं सहभागी झाले असल्याने राष्ट्रवादीच्या अजित पवार गट सामाजिक न्याय विभागाचे महानगर जिल्हाध्यक्ष जितेंद्र अरुण भाई चांगरे यांनी या उपोषण स्थळी भेट दिली.
यावेळी जितेंद्र चांगरे यांनी अखील भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या मांगण्या संदर्भात अजित दादा पवार यांचे स्वीय सहाय्यक ढेकळे यांच्याशी फोनवरून संपर्क साधत चर्चा करून उपोषण बाबत माहिती दिली.