जळगाव – येथील दिगंबर जैन बहुउद्देशीय मंडळातर्फे समाजातील ४२ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. दिगंबर जैन बहुउद्देशीय मंडळातर्फे आयोजित पर्युषण महापर्व सांगता सोहळा ओक मंगल कार्यालयात संपन्न झाला.
यावेळी जेष्ठ पत्रकार धन्यकुमार जैन, सामाजिक कार्यकर्त्या सुनिता डेरेकर, शुभ आरंभ फाउंडेशनचे संस्थापक चंदन जैन यांच्या हस्ते जिल्ह्यातील ४२ गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात आर्या सैतवाल हीच्या मंगलाचरणाने झाली. तर तोंडापूर येथील अंजली जैन हिने पर्युषण महापर्व व समाज यावर मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रम समिती अध्यक्ष महावीर सैतवाल, मंडळाचे अध्यक्ष गणेश डेरेकर, उपाध्यक्ष दिपक जैन, रमेश खोबरकर, पवन जैन, सागर जैन, योगेश काळे, राहुल शिंपी, देवेंद्र डेरेकर, सुनिल अपकाळे, भावेश आंबेकर, रुपेश जैन, अनिल अपकाळे, विजय सैतवाल, जिनेंद्र सैतवाल, सचिन सैतवाल, प्रदिप सैतवाल, श्रीकृष्ण चतुर, दिपक फुलमोगरे, मनिष संगवे, दिलीप जैन, राजेंद्र सुलाखे, विश्वनाथ जैन, अजय सुर्यवंशी आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन भावेश जैन, संतोष जैन यांनी तर आभार प्रदर्शन दिपक फुलमोगरे यांनी केले.