जळगाव – केशवस्मृती प्रतिष्ठान संचालित आयोजित ललित कला संवर्धिनी आयोजित २१ वा भुलाबाई महोत्सव छ. संभाजीराजे नाट्यगृहात साजरा झाला. खानदेशातील लोकसंस्कृतीमध्ये भुलाबाईला अनन्य साधारण महत्व आहे. भुलोजी आणि भुलाबाईला साक्षात शंकर आणि पार्वतीचे रूप मानून त्यांची मनोभावे पूजा केली जाते.
यानिमित्ताने सायंकाळी मुली एकत्रित येवून भुलाबाईचे गाणे सादर करत घरोघरी हिंडायच्या या माध्यमातून एकमेकींचे नाते आणि एकोपा टिकण्यास मदत होत असे. परंतु काळाच्या ओघात या लोकपरंपरेला उजाळा हा उत्सवाने होतो. अशा या उत्सवाचे महत्व जाणून केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित ललित कला संवर्धिनी च्या माध्यमातून या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ९.३० वाजता मायादेवी मंदिर ते छ. संभाजीराजे नाट्यगृह पर्यत भुलाबाईची वाजत-गाजत पालखी काढण्यात आली.
स्पर्धेचे उद्घाटन सकाळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ विद्या गायकवाड, विवेकानंद प्रतिष्ठानच्या सह्कोषध्याक्षा हेमा अमळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावर्षीच्या भुलाबाई महोत्सव मध्ये चांद्रयान-३, महिला आरक्षण, G20, आंतरराष्ट्रीय तृण धान्य वर्ष, पाणी वाचवा- पाणी अडवा, छ शिवाजी महाराज यांचे ३५० वे राज्यभिषेक वर्ष, स्मार्ट फोनचा वापर विषयात जनजागृती करणाऱ्या गीतांचा संगम दिसुन आला.
बाईपण भारी देवा चित्रपटा मुळे यावर्षी महिला मध्ये गत वर्षापेक्षा अधिक उत्सुकता होती. प्रत्येक सांगत १२ ते १५ सदस्यांचा समावेश होता व स्वत सादर केलेले गीत सादर करणे हे या स्पर्धेचे वैशिट्य आहे. स्पर्धेत जळगाव जिल्हातील एकूण ३७ संघ सहभागी झाले होते. स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ सायंकाळी ५.३० मध्य रेल्वे भुसावळ विभागाच्या डीआरम इती पांडे, केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, केके कन्स चे प्रशांत कोठारी यांच्या प्रमुख उपस्थिती पार पडला.
यावेळी उपस्थित महिलांशी संवाद साधतांना इती पांडे यांनी केशवस्मृती प्रतिष्ठान सामाजिक कामातून महिलासाठी सामाजिक कामाची जनजागृती होण्यासाठी राबवीत असलेला उपक्रम स्तुत्य असल्याचे नमूद करत सर्वांनी एकत्र येऊन लोकपरंपरा व संस्कृती जतन करावी हा संदेश दिला तसेच कला अंगी असेल तर जीवनात अधिक आनंदी व्यक्ति राहतो . नव्याने संस्कृतीची ओळख झाली असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमात भुलाबाईची आरती प्रांजली रस्से यांनी म्हटली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वैशाली पाटील, प्रीती झारे, संस्कृती पवनीकर, तारका महाजन, अनुश्री देशपांडे, सेजल वाणी, इंद्रायणी आंबीकर या सदस्यांनी केले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविकात कार्यक्रम प्रमुख सौ . स्वाती फिरके यांनी केशव स्मृती प्रतिष्ठानची लोकसंस्कृती जपण्याची भूमिका स्पष्ट केली . तर कार्यक्रमाचे आभार साधना दामले यांनी मानले.
या कार्यक्रमात एकूण ३७ संघाचा सहभाग होता .
खुल्या गटात सर्वांना भुलाबाईचे गीत व त्यावर नृत्य सादर केले दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महिला व मुलीनी भुलाबाईच्या पारंपारिक लोकगीताचा समावेश भुलाबाई महोत्सवात केला. मुली व महिला या उत्सवात हिरहिरीने सहभाग नोंदवून मनसोक्त आनंद साजरा केला. या मध्ये ५ ते १० वयोगटाचा एक गट व ११ ते १६ वर्षे एक गट पुढील खुला गट यंदाच्या वर्षी शहरी व ग्रामीण असे नियोजन करण्यात आले होते . या स्पर्धेचे परीक्षण पुष्पा पाटील, स्नेहा एकतारे, ज्योत्सना रायसोनी, धनश्री जोशी, स्मिता दीक्षित, स्वाती कुलकर्णी यांनी केले .स्पर्धेत प्रत्येक गटास प्रथम, द्वितीय, तृतीय आणि , उत्तेजनार्थ बक्षिस देण्यात आले .बक्षीस पात्र संघांची नावे पुढील प्रमाणे आहेत .
शहरी विभाग
लहान गट –
प्रथम – सावित्रीबाई फुले गट
द्वितीय – रोझल्यंड इंग्लिश मीडियम स्कूल
तृतीय – काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल
उत्तेजनार्थ – मुक्ताई सेवावस्ती हरी विठ्ठल नगर
ग्रामीण विभाग
प्रथम – साने गुरुजी विद्यामंदिर, चोपडा
द्वितीय – मयुरेश्वर गट, कुसुंबा
मोठा गट
शहरी विभाग
प्रथम – अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूल
द्वितीय – उमा महेश गट शानबाग विद्यालय जळगाव
तृतीय – विवेकानंद प्रतिष्ठान जळगाव
उत्तेजनार्थ – माध्यमिक विद्यालय शारदा कॉलनी जळगाव
ग्रामीण विभाग
प्रथम – शारदा विद्या मंदिर साकळी ता. यावल
द्वितीय – अहिल्याबाई विद्यालय, भुसावळ
*खुला गट*
शहरी विभाग
प्रथम – सखी माऊली, रामानंदनगर
द्वितीय – श्रावणी गट
तृतीय – ग्लोबल फाउंडेशन जळगाव
उत्तेजनार्थ – पोद्दार विद्यालय जळगाव
ग्रामीण विभाग
प्रथम – शिवशक्ती गट, भुसावळ
द्वितीय – सखी गृप, जामनेर