गोंडगाव (ता.भडगाव) – येथील आठ वर्षीय बालिकेवर एका नराधमाने अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना घडली. या घटनेचे पडसाद जळगाव जिल्ह्यातच नव्हे तर संपुर्ण राज्यात पहावयास मिळत आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपलीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे. त्यामुळे या खटल्यासाठी राज्याचे विषेश सरकारी अॅड उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी अशी मागणी आहे.
सदरचा खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याचा यापुर्वी आपण निर्णय घेतला आहे. त्यामुळे या खटल्यासाठी अॅड उज्ज्वल निकम यांची तत्काळ नियुक्ती करावी. तर त्यांना सहाय्य अभियोक्ता म्हणून मालेगावचे सरकारी वकील अॅड शिशीर हीरे यांना या खटल्यासाठी नियुक्त करण्यात यावी अशी मागणी केली आहे. तर पीडीत बालिकेचे वडील हे दिव्यांग आहेत. त्यांच्या कुटुंबाची परीस्थीती अंत्यत हलाखीची आहे. ही परीस्थीती पाहाता राज्य शासनाकडून या कुटुंबाच्या पुनर्वसनाचा निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत गृह विभागाला याबात कार्यवाही चे आदेश दिल्याचे आमदार कीशोर पाटील यांनी सांगीतले.
गोंडगावची घटना अंत्यत गंभीर आणि मन हेलावणारी आहे. त्यामुळे या खटल्यासाठी अॅड उज्जवल निकम यांची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्र्याकडे केली आहे. त्यांनी ह्यावर सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. लवकरच त्याबाबत घोषणा होईल.
-किशोर पाटील
आमदार पाचोरा-भडगाव