जळगाव – विशेष मिशन इंद्रधनुष्य ५.० हा नियमित लसीकरणापासून वंचित राहिलेल्या मुलांना राहिलेल्या सर्व लसी देणे आणि आणि गोवररुबेला सारख्या आजारांपासून देश मुक्त करण्याचा एक मोठा प्रयत्न जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केला जात आहे. या मोहिमेत काही लसी राहिलेल्या गरोदर महिला आणि पाच वर्षापर्यंतच्या बालकांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी विशेष लसीकरण सत्र आयोजित करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भयेकर यांच्यातर्फे देण्यात आली.
पात्र लाभार्थ्याना १०० टक्के लाभ देऊन विशेष मिशन इंद्रधनुष ५.० मोहिम यशस्वी करने याचे सूक्ष्म निजोजन जिल्ह्याचे जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ मनीषा बांगर यानी केले आहे तर अधिकच्या माहिती करीता आणि लाभ घेण्यासाठी नाजिकचे आरोग्य उपकेन्द्र, प्राथमिक आरोग्य केन्द्रशी संपर्क करावा असे आवाहन जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सचिन भयेकर यानी केले आहे.
मोहिमेचा उद्देश –
• ते २ वर्ष (७ ते २३ महिने) वयोगटातील लसीकरणापासून वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांचे सर्व लसीद्वारे लसीकरण करणे.
• २ ते ५ वर्ष वयोगटातील ज्या बालकांचे गोवर रुबेला लसीचा पहिला व दुसरा डोस राहिला असेल तसेच डीपीटी व ओरल पोलिओ लसीचा बुस्टर डोस राहिला असेल त्यांचे लसीकरण करणे.
• गर्भवती महिला यांचे लसीकरण कार्यक्रमांतर्गत दिल्या जाणाऱ्या लसीद्वारे लसीकरण करणे.
• ६ ऑगस्ट २०१८ किंवा त्यानंतर जन्मलेल्या बालकांचा यामध्ये समावेश असेल.
विशेष मिशन इंद्रधनुषचे ५.० चे वेळापत्रक –
मिशन इंद्रधनुष ५.० पुढील ३ महिन्यांमध्ये राबविण्यात येणार आहे
• पहिला महिना – ७ ते १२ ऑगस्ट २०२३ M
• दुसरा महिना – ११ ते १६ सप्टेंबर २०२३
• तिसरा महिना – ९ ते १४ ऑक्टोबर २०२३.
ही मोहिम प्रत्येक महिन्यात ६ कामकाजाचे दिवसांमध्ये राबविण्यात येईल.
कृती नियोजन –
० मोठया प्रमाणात झिरो डोस, सुटलेले व वंचित राहिलेले लाभार्थी असलेले क्षेत्र
● गोवर आजारासाठी अति जोखमीचा भाग
● नियमित लसी कार्यक्रमांतर्गत नवीन लसीचा समावेश केल्यानंतर कमी काम असलेले क्षेत्र
• जास्त दिवस नियमित लसीकरण सत्र न घेतलेले क्षेत्र तसेच उपकेंद्राचे एएनएमचे पद ३ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी रिक्त आहे असे क्षेत्र
● स्थलांतरीत होणाऱ्या झोपडपट्टया व स्थायी शहरी व शहराला लागून असणा झोपडया/झोपडपट्टी
● गोबर, घटसर्प व डांग्या खोकलाचे सन २०२२-२३ या वर्षांत उद्रेकग्रस्त भाग
● लसीकरणास नकार देणारे प्रतिसाद न देणारे क्षेत्र
सत्राचे नियोजन –
● सर्व आरोग्य संस्था – प्रा.आ. केंद्र, शहरी आरोग्य केंद्र, ग्रा. रु. उ. जि. रु. द्द. बाहयसंपर्क सत्र ठिकाणी उपकेंद्र, अंगणवाडी केंद्र, शाळा, पंचायत घर व इतर ठिकाणी सत्रांचे आयोजित केले जातील.
● सत्राची वेळ सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत असेल. लाभार्थ्यांच्या उपलब्धतेनुसार ही वेळ बदलता येईल. उदा. संध्याकाळी उशिरा.