जळगाव – आत्मनिर्भर महिला बहुउद्देशीय संस्थेतर्फे ब्युटी पार्लर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि.११ जून पासून अर्चना पाटील यांनी केले होते प्रशिक्षण शिबिरामध्ये ६५० महिलांनी सहभाग नोंदवला असून आज कार्यक्रमाचा समारोपाच्या दिवशी सर्व महिलांचा मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या हस्ते प्रमाणपत्र व गिफ्ट देऊन सत्कार करण्यात आले.
कार्यक्रमाचा समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार राजू मामा भोळे, नगरसेवक कैलास सोनवणे, माजी महापौर सीमा भोळे, नगरसेविका रंजना वानखेडे, रंजना सपकाळे यांची उपस्थिती होती.
यावेळी जयमाला वराडे, कोमल होले, दीपमाला सोनवणे, अश्विनी पाठक, सीमा कासार, संगीता चौधरी, पूनम महाजन, वर्षा राणे, वैशाली कोळी, भाग्यश्री शिंपी, वैशाली कोळी, तेजस्विनी बोंडेचा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय पाटील, गुणवंतराव झोपे, ललित चौधरी, चैतन्य कोल्हे, भूषण भोळे, अमेय राणे, मुविकोराज कोल्हे, राहुल तळेले यांनी परिश्रम घेतले होते