जळगाव – शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ज्या मध्ये केंद्र सरकार शेतकऱ्यांना वार्षिक रू.६०००/- निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करत असतात. त्याचप्रमाणे राज्य सरकारने नमो शेतकरी निधी योजना ही मंजूर केेली असून या करीता शेतकऱ्यांच्या प्रलंबित ई – केवायसी, बँक खाते आधार संलग्न करणे इ. काम करण्याची सूचना मंत्री गिरीश महाजन यांनी केली असून त्यासाठी जिल्हा प्रशासन व कृषि विभागास भारतीय जनता पार्टी, जी.एम.फाउंडेशन चे प्रतिनिधी गाव स्तरावर करणार सहकार्य कामे करणार आहे.
जळगाव जिल्ह्यातील आज अखेर अंदाजित 72,000 शेतकऱ्यांचे ही कामे प्रलंबित असून हे काम अपूर्ण राहिल्यास शेतकऱ्यांना केंद्र व राज्य सरकारचा निधी मिळण्यापासून वंचित राहावा लागेल. याकरिता महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांनी तात्काळ गाव पातळीवर ऑनलाईन ॲप द्वारे, सेतू सुविधा केंद्र यांच्या मदतीने सदरचे काम पूर्ण करावे या करीता भारतीय जनता पार्टी व जी.एम. फाउंडेशन चे प्रतिनिधी गाव पातळीवर कृषी सहाय्यक यांना सहकार्य करणार आहेत.
भाजपा पदाधिकारी व जी.एम. फाउंडेशन पदाधिकारी याना या बाबतीत जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्या अधिनस्त असलेले तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषि अधिकारी प्रविण सोनवणे, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक नरेंद्र पाटील व त्यांची टीम यांनी मार्गदर्शन केले तसेच
शेतकऱ्यांना या पीक विमा व केवायसी बाबत कसे समजावून सांगायचे व जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ कसा प्रकारे मिळेल याविषयी मार्गदर्शन करण्यात आले असून हा कार्यक्रम जी.एम.फाउंडेशन येथे पार पाडण्यात आला.
कार्यक्रमाला जळगाव जिल्हा दुध उत्पादक संघ संचालक अरविंद देशमुख यांची ऑनलाईन झुम द्वारे उपस्थिती होती. यावेळी जळगाव लोकसभा क्षेत्र प्रमुख तथा जिल्हा सरचिटणीस डॉ राधेश्याम चौधरी, भाजपा जळगाव जिल्हा अध्यक्ष दीपक भाऊ सुर्यवंशी, ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, नगरसेवक तथा प्रदेश कार्यकारणी सदस्य उज्वला बेंडाळे , महिला आघाडी प्रदेश चिटणीस रेखा वर्मा, महिला आघाडी अध्यक्ष दीप्ती चिरमाडे ,ओबीसी आघाडी जिल्हा अध्यक्ष रेखा पाटील , युवा मोर्चा अध्यक्ष आनंद सपकाळे, सरचिटणीस मिलिंद चौधरी , जिल्हा चिटणीस राहुल वाघ, चित्रा मालपाणी, जिल्हा उपाध्यक्ष अमित भाटिया, माजी जळगाव तालुका अध्यक्ष संजय भोळे, बापु ठाकरे , कार्यालय मंत्री गणेश माळी, जी एम फाउंडेशनचे सहकारी भुषण भोळे, अमेय राणे, मनोज वाणी, राहुल पाटील ,तुषार चौधरी, चैतन्य कोल्हे, मुविकोराज कोल्हे ,यशवंत पाटील, होनाजी चव्हाण, अविनाश कोळी व इतर सहभागी होते.