जळगाव – येथील जिल्हा सत्र न्यायालय आवारात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व गांधी रिसर्च फाऊंडेशन यांच्या संयूक्त विद्यमाने महानगरपालिकेच्या सहकार्यातून स्वच्छता अभियानासह जनजागृती करण्यात आली. ‘सुंदर, स्वच्छ आणि हरीत जळगाव’ या संकल्पनेवर कार्य करण्याचा संकल्प न्यायालयीन सहकाऱ्यांनी केला.
जवळपास ४ टन कचरा संकलित करून महानगरपालिकतर्फे घंटागाडी द्वारे त्याची विल्हेवाट लावण्यात आली. सकाळ पासून सुरू असलेल्या स्वच्छता उपक्रमात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एस. पी. सय्यद, कोर्ट व्यवस्थापक जगदिश माळी, अधिक्षक सुभाष एन पाटील, अश्विनी भट, प्रमोद पाटील, अविनाश कुळकर्णी, प्रमोद ठाकरे, हर्षल नेरपगारे, मनोज बन्सी, जावेद एस. पटेल, प्रकाश काजळे, जितेंद्र भोळे, महापालिकेचे सहाय्यक आयुक्त उदय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जितेंद्र करंगे, रमेश कांबळे, अर्जून पवार यांच्या स्वच्छता विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या वतीने मदन लाठी, हेमंत बेलसरे, सुधीर पाटील, तुषार बुंदे व स्वयंसेवक उपस्थित होते. जैन इरिगेशनच्या वतीने अनिल जोशी, बाळू साबळे, देवेंद्र पाटील उपस्थित होते. गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनी स्वच्छता अभियानासह पर्यावरणाबाबत जनजागृती केली. प्लास्टीकचा कमीत कमी वापर करण्यासह गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या ‘सुंदर जळगाव, स्वच्छ जळगाव आणि हरीत जळगाव’ या संकल्पनेविषयी सांगितले.
यावर न्यायालयीन सहकाऱ्यांनी माझे घर, वॉर्ड, शहर स्वच्छ ठेवण्याची आपली जबाबदारी असल्याचे सांगत, त्यावर कार्य करणार असल्याची ग्वाही दिली. नियमित स्वच्छता मोहिमेसाठी पाच ते सहा स्वयंसेवकांची एक टिम करण्याचा मानस यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला. त्याला गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांचे मार्गदर्शन राहिल. येणाऱ्या काळात नियमीत शहराला स्वच्छ, सुंदर, हरित ठेवण्याचे उपक्रम राबविले जातील असेही यावेळी सर्वांच्या वतीने जाहिर करण्यात आले.