मुक्ताईनगर – मुक्ताईनगर येथे राज्य परिवहन महामंडळाचे एस. टी. बसस्थानक असून तालुक्याचे मुख्य ठिकाण असल्याकारणाने तसेच राष्ट्रीय महामार्गावरील प्रमुख ठिकाण व आदिशक्ती मुक्ताईचे अंतर्धान स्थळ असल्या कारणाने दररोज हजारो प्रवासी,भाविक आणि तालुकाभरातील विद्यार्थी या बसस्थानका वरून ये जा करत असतात परंतु येथील बसस्थानकाची इमारत, स्वछतागृह हे निव्वळ शोभेच्या वास्तू बनल्या असुन स्वच्छतेअभावी बस स्थानक आणि स्वच्छतागृहाची/प्रसाधनगृहाची दुर्दशा झालेली आहे.
प्रसाधनगृहांच्या दुरावस्थेमुळे प्रवाशांची कुचंबना होत असून, ही बाब विद्यार्थ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्या कानावर घातली असता, आज रोहिणी खडसे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह मुक्ताईनगर बसस्थानक गाठत स्वछतागृहांची पाहणी केली असता यावेळी पुरुष ,महिला प्रसाधन गृहाची प्रचंड दुरावस्था झालेली असुन संपूर्ण घाण पसरली आहे गेले कित्येक दिवसापासून या प्रसाधनगृहांची स्वच्छता करण्यात आलेली नसून बसस्थानकावर पाणीसुद्धा उपलब्ध नाही
बस स्थानक परिसरात, बस स्थानकात घाणीचे साम्राज्य पसरले असून प्रचंड दुरवस्था व अस्वच्छता आढळून आली. रोहिणी खडसे यांनी स्वछतागृह व बस स्थानकाची स्वच्छता करण्याबाबत आगरप्रमुख पवार यांना धारेवर धरले व तत्काळ स्वच्छता करण्यात यावी अशी मागणी केली. यावेळी बोलतांना रोहिणी खडसे म्हणाल्या की, प्रवाशांनी याबाबतीत माझ्याकडे वारंवार सांगितल्या नंतर मि वेळोवेळी या बाबतीत आगार प्रमुख, जिल्हा नियंत्रक यांच्या कडे बसस्थानक आणि स्वछतागृहाची स्वच्छता करण्या बाबत वेळोवेळी लेखी तक्रारी केलेल्या आहेत परंतु संबंधितां कडून याबाबतीत कधीच लक्ष दिले जात नाही.
नुकतेच नविन शैक्षणिक वर्षास सुरुवात झाली असून बस स्थानकावर दररोज शालेय विद्यार्थ्यांची ये जा असते आज मला अशाच एका विद्यार्थिनीचा फोन आला तिने स्वच्छतागृह/प्रसाधनगृहात असलेल्या अस्वच्छते आणि दुरावस्थे विषयी मला माहिती दिली व बस स्थानकात येऊन पाहणी करण्या विषयी विनंती केली. याबाबत आगार प्रमुख पवार यांना समक्ष बोलावून त्यांना ही दुरावस्था, अस्वच्छता निदर्शनास आणून दिली. त्यावर आगरप्रमुख यांनी यासाठी वरिष्ठां कडे बोलावे लागेल असे सांगून वेळ टाळून नेण्याचा प्रयत्न करत आहेत.
एकीकडे सरकार जाहिरातींवर लाखो, करोडो रुपये खर्च करत असुन दुसरीकडे नागरिकांना मुलभूत सुविधा देण्यासाठी सुद्धा टाळाटाळ करत आहे. वारंवार लेखी तक्रारी करून सुद्धा प्रशासन गेंड्याची कातळी पांघरून परिस्थिती जैसे थे ठेऊन अस्वच्छते द्वारे रोगराई वाढवून नागरिकांच्या जिवाशी खेळत आहे असे सांगितले. ही परिस्थिती अशीच राहिलीतर आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आंदोलन करण्यात येईल असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकऱ्यां कडून सांगण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष राजेंद्र माळी, युवक शहराध्यक्ष बबलू सापधरे, बापु ससाणे,मनोज तळेले, बाळा भालशंकर,संजय कोळी,एजाज खान,रउफ खान,राहुल पाटील,पांडुरंग नाफडे, चेतन राजपूत ,अजय तळेले, पदाधिकारी नागरिक उपस्थित होते.