जळगाव – जिल्ह्यातील बोदवड Bodwad तालुका हा सध्या प्रचंड पाणी टंचाईच्या झळ सोसत असून यावर विहीर अधिग्रहण, टँकर द्वारे पाणीपुरवठा अशा उपाययोजना करून नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या साहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देऊन करण्यात आली
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, बोदवड तालुका हा अवर्षणग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात पाण्याचा कुठलाही नैसर्गिक स्त्रोत उपलब्ध नाही. त्यामुळे संपूर्ण तालुक्याला मुक्ताईनगर येथुन पुर्णा नदीवरून असलेल्या ओ.डी.ए. पाणीपुरवठा योजनेवर अवलंबून रहावे लागते.ओ.डी.ए. योजनेदवारे बोदवड तालुक्यातील गावांमध्ये पाणीपुरवठा केला जातो. परंतु विद्युत पुरवठा आणि काही तांत्रिक कारणाने तसेच ओ.डी.ए. योजनेची पाइपलाइन हि वारंवार फुटत असते फुटलेली पाइपलाइन जोडायला विलंब होतो या कारणाने चार पाच दिवसाआड मिळणारे पाणी आठ,दहा दिवसाआड मिळते.
काही गावांमध्ये थोडा फार पाणीसाठा असलेल्या विहरीद्वारे पाणी पुरवठा केला जातो परंतु सध्या उन्हाळा संपायला आला असून जून महिना उजाडला आहे तरी पाऊस पडत नसल्या कारणाने त्या विहरीची पाणीपातळी शून्यावर गेली आहे त्यामुळे बोदवड तालुक्यातील सर्वच गावांमध्ये भिषण पाणीटंचाई जाणवत आहे नागरिकांना,गुरा ढोरांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. प्रशासन या बाबिची गांभीर्याने दखल घेत नसून नागरिकांना,गुरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी आतापर्यंत कोणत्याही ठोस उपाययोजना प्रशासनाद्वारे करण्यात आलेल्या नाहीत.
बोदवड तालुक्यात ४४ गावात जलजीवन मिशन योजने अंतर्गत पाणीपुरवठा योजनेची कामे चालू आहेत परंतु काही गावांमध्ये पाण्याचा स्त्रोत उपलब्ध नसताना सुद्धा पाइपलाइन, टाकी बांधकाम अशा कामांवर शासनाच्या निधीचा अपव्यय केला जात आहे. या योजने अंतर्गत काही ठिकाणी जुन्या विहरीना पाणी उपलब्ध नसताना परत त्याच विहरीचे खोदकाम केले जात आहे
पाणी पुरवठा योजनेचे काम करताना योजनेचे निकष पायदळी तुडवून ग्रामस्थांचा विरोध असताना ही कामे केल्या जात आहेत. तरी जिल्हाधिकारी यांनी या सर्व बाबींची गांभीर्याने दखल घेवून नागरिकांना, गुरा ढोरांना पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी शक्य त्या उपाययोजना तत्काळ कराव्यात. शक्य त्या गावांमध्ये खाजगी विहीर अधिग्रहित करण्यात याव्यात जेथे शक्य नसेल तेथे टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात यावा त्याचबरोबर ओ.डी.ए. योजनेवर विशेष लक्ष देवून काही समस्या उदभवल्यास ती सोडविण्यासाठी तांत्रिक जाण असलेल्या व्यक्तीचे विशेष पथक तयार करावे जेणेकरून पाणी पुरवठा सुरळीत सुरु राहील तसेच जलजीवन मिशनच्या कामांकडे विशेष लक्ष देऊन काम योग्य त्या पद्धतीने अंदाजपत्रकानुसार करून घेऊन शासनाच्या निधीचा अपव्यय वाचवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी बोलतांना रोहिणी खडसे म्हणाल्या की, बोदवड तालुक्यातील सर्वच गावात प्रचंड पाणी टंचाई जाणवत असुन प्रशासनाने पाणी टंचाई वर करण्यात येणाऱ्या उपाययोजना अद्याप केलेल्या नसल्या कारणाने पाणी टंचाईची तीव्र झळ जाणवत आहे. ओडिए योजनेची पाईप लाईन वारंवार फुटते त्यामुळे पाणी पुरवठा आठ ते दहा दिवसांनी होतो, अद्याप विहिरीचे अधिग्रहण झालेले नाही ,टँकर सुरू झालेले नाहीत ते लवकरात लवकर सुरू करण्यात यावे. जलजीवन मिशन योजनेची कामे अंदाजपत्रक नुसार आणि नियमानुसार करण्यात यावीतअशी आम्ही मागणी केली आहे. ‘पाण्यासाठी माता भगिनी फिरताय दारोदारी, आणि सरकार म्हणते शासन आपल्या दारी’ अशी व्यंगात्मक चारोळी सांगून त्यांनी सरकारवर टिका केली
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे बोदवड तालुका अध्यक्ष प्रशांत(आबा)पाटील, मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष यु डी पाटील सर, बोदवड शहराध्यक्ष प्रदिप बडगुजर,युवक तालुका अध्यक्ष विनोद कोळी,रामदास पाटील,राजेंद्र फिरके,विजय चौधरी, बोदवड येथील गटनेते जाफर शेख, नगरसेवक भरत अप्पा पाटील,लतीफ शेख, मुजमिल शहा,हकीम बागवान, गोपाळ गंगतिरे,निलेश पाटील, किरण वंजारी,प्रविण पाटील,संभाजी पारधी,प्रफुल पाटील,रविंद्र अटक,मनोज बोदडे, श्रीकांत शिंदे, प्रदिप साळुंखे , मयुर खेवलकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बोदवड तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते उपस्थित होते