जळगाव – …एरवी घरोघरी छोट्या-मोठ्या कारणावरून थेट टोकापर्यंत ताणल्या जाणाऱ्या नवरा-बायकोच्या वादाला ‘ फ्यांटसी ‘ची खमंग फोडणी दिली तर ,त्याची चव काही वेगळीच वाटते. कलादर्श प्रस्तूत, ‘वेगळं असं काहीतरी ‘ द्वारे अशाच शेवटपर्यंत निभावून न्यावयाच्या ‘या’ गोड नात्यावर उपरोधिक पण खुशखुशीत भाष्य करणारे नाटक ‘रतनलाल सी.बाफना ज्वेलर्स’ च्या अनमोल सहकार्याने जळगावकर रसिकांसाठी सादर होतंय.
नुकतंच गुरुवार, दि. २२ जून रोजी रतनलाल सी बाफना ज्वेलर्स च्या नयनताराजी बाफना, श्री. सुशीलजी बाफना तसेच नाट्यकलाकार श्री. सचिन चौघुले यांच्या उपस्थितीत रतनलाल सी बाफना ज्वेलर्स च्या ‘नयनतारा -२’ शोरूम ला नाटकाच्या प्रवेशिकेचे अनावरण करण्यात आले. येथील कलादर्श प्रस्तूत,महालक्ष्मी थियेटर्स निर्मित, ‘वेगळं अस्स काहीतरी’ या वरिष्ठ रंगकर्मी व नाट्यशास्राचे व्यासंगी डॉ.हेमंत कुलकर्णी लिखित,दिग्दर्शित दोन अंकी नाटकाचा प्रयोग शनिवार दि.१ जुलै २०२३ रोजी सायं.७.३० वाजता छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात रसिकांच्या आग्रहास्तव ठेवण्यात आला आहे .
जळगावच्या सांस्कृतिक वाढीसाठी योगदान देणाऱ्या मोजक्या दात्यांपैकी एक ,सुवर्ण-नगरीतील प्रसिद्ध पेढी म्हणून नावलौकिक प्राप्त ,’रतनलाल सी.बाफना ज्वेलर्स ‘प्रायोजित ‘वेगळं अस्स काहीतरी ‘या नाटकात, कलावंत सर्वश्री पद्मनाभ देशपांडे,मंजुषा भिडे,योगेश शुक्ल,दीप्ती बारी,अमोल ठाकूर ,डॉ.श्रद्धा पाटील-शुक्ल आदींचा सहभाग आहे. महाराष्ट्र नाट्य स्पर्धा,कामगार नाट्य व औद्योगिक नाट्य स्पर्धेतही या नाटकाचे प्रभावी सादरीकरण झाले आहे .
खास रसिकांच्या आग्रहास्तव रतनलाल सी.बाफना प्रायोजित,’वेगळं अस्स काहीतरी ‘या नवरा-बायकोच्या नात्याचं वेगळपण नेमकेपणाने सांगणाऱ्या नाटकास रसिक व बाफना समूहाच्या ग्राहक कुटुंबीयांनी शनिवार, १ जुलै रोजी उपस्थिती द्यावी असे आवाहन उभय संस्थांतर्फे करण्यात आले आहे .नाटकासाठी प्रवेश विनामूल्य असून,सन्मान प्रवेशिकेसाठी सचिन:-९४२००६८२९५ व योगेश:-९६५७७०१७९२ यांचेशी संपर्क साधावा